The removal of Kangana Ranaut and my entry is a mere coincidence, noticed by Suvrat Joshi's post. | 'कंगना राणौतला हाकलणं आणि माझी एन्ट्री होणं, हा तर निव्वळ योगायोग', सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधले लक्ष

'कंगना राणौतला हाकलणं आणि माझी एन्ट्री होणं, हा तर निव्वळ योगायोग', सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधले लक्ष

मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुव्रत जोशी सोशल मीडियावर सक्रीय असून तो नेहमी या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. तसेच तो विविध मुद्द्यांवरदेखील आपले मत मांडत असतो. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या पोस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा उल्लेख केला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

खरेतर सुव्रत जोशीनेट्विटरवर आज त्याचे अकाउंट सुरू केले. त्याने हे चाहत्यांना सांगताना कंगना राणौतचा उल्लेख त्याच्या पोस्टमध्ये केला आहे. त्याने लिहिले की, आईची शप्पथ... हिला हाकलणे आणि मी ट्विटरवर येणे याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये! मी तिची जागा घेऊ इच्छित नाही आणि ती उडवते तसे ज्ञानशिंतोडे उडवायची माझ्या मेंदूची क्षमताही नाही. तर माझी टिव्हटीव्ह तिथेही सुरू करतोय... फॉलो करा!


सुव्रत जोशीच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सुव्रत जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने लॉकडाउनमध्ये छूमंतर या मराठी चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अभिनेता ऋषी सक्सेना दिसणार आहेत. 


'छुमंतर' हा लॉकडाउननंतर परदेशात चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे आणि त्याचा भाग असल्याचा अतिशय आनंद होत असल्याचे सुव्रत म्हणाला आणि पुढे म्हटले की, एरव्ही मी पडद्यामागे घडलेल्या गोष्टींना फार महत्व देत नाही,त्यात आलेल्या 'आव्हानांचे' भांडवल करणेही मला आवडत नाही. प्रत्येक कामात अशी संकटे येतात आणि कलाक्षेत्रात कला महत्वाची! पण तरीही यावेळी परिस्थिती पूर्ण वेगळी होती. समोरील अनिश्चितता अभूतपूर्व होती. आता लंडन मध्ये पुन्हा लॉक डाउन जाहीर झाला आहे पण आमचा सर्व संच तिथे काम पूर्ण करून आपापल्या गावी सुखरूप परतला आहे.याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The removal of Kangana Ranaut and my entry is a mere coincidence, noticed by Suvrat Joshi's post.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.