Priya Berde will be seen in Bigg Boss Marathi house? | 'बिग बॉस'च्या घरात जाणार का प्रिया बेर्डे? खुद्द ऐका त्यांच्याकडून

'बिग बॉस'च्या घरात जाणार का प्रिया बेर्डे? खुद्द ऐका त्यांच्याकडून

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या रिएलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार पहायला मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यात अद्याप अधिकृतरित्या कोणतीही नावे समोर आलेली नाहीत. मात्र मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना 'बिग बॉस'च्या घरात जाण्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, बिग बॉसमध्ये जायला आवडेल, पण आता नाही.

प्रिया बेर्डे यांनी 'बिग बॉस'च्या घरात जाण्यासाठी उत्सुक आहे. पण सध्या नाही असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, 'मला यंदाच्या सीझनसाठी विचारण्यात आले होते. पण मी नकार दिला. खरेतर मला जायला आवडेल पण ही ती वेळ नाही. तिथे जाण्याच्या मेंटल स्टेजमध्ये मी नाही. सध्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे चार महिन्यासाठी मुलांना एकटे टाकून तिथे जाणे आई म्हणून बेजबाबदारपणा वाटतो. तसेच त्यावेळी माझा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'रंपाट' चित्रपटाचे प्रमोशन सुरू होते. त्यामुळे मी सध्या नाही सांगितले. पुढील काही वर्षात मला बिग बॉसच्या घरात जायला आवडेल.' 


प्रिया बेर्डे यांनी बिग बॉसच्या घरात जाणे म्हणजे स्वतःची परीक्षा असते असे सांगितले आणि म्हणाल्या, 'तिथे जाऊन जिंकणे, दुसऱ्यावर कुरघोडी करणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. तिथे जाऊन मी त्या घरात कशी सर्व्हाइव्ह होऊ शकते याचा विचार करेन. तिथे मला काय शिकायला मिळेल व पॉझिटिव्ह दृष्टीने पाहीन. गॉसिप व भांडण हा माझा पिंड नाही.'

Web Title: Priya Berde will be seen in Bigg Boss Marathi house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.