प्रशांत दामले लवकरच चाहत्यांना देणार "मत्त आनंदाची बातमी", पोस्टने वाढवली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 03:54 PM2020-11-24T15:54:58+5:302020-11-24T15:55:23+5:30

प्रशांत दामले यांनी फेसबुक वर एक पोस्ट केली आहे. चाहत्यांचीही उत्सुकता वाढली.

Prashant Damle All Set To Give Good News Soon Caught Everyone Attention On Social Media | प्रशांत दामले लवकरच चाहत्यांना देणार "मत्त आनंदाची बातमी", पोस्टने वाढवली उत्सुकता

प्रशांत दामले लवकरच चाहत्यांना देणार "मत्त आनंदाची बातमी", पोस्टने वाढवली उत्सुकता

googlenewsNext

नाट्यरसिकांना खळखळून हसवणारे आणि रसिकांचं धमाल मनोरंजन करणारे अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांच्या संपर्कात असतात. त्यांचे आगामी प्रोजेक्ट किंवा मग एखादी खास गोष्ट ते नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त करताना दिसतात. नुकतेच प्रशांत दामले यांनी फेसबुक वर एक पोस्ट केली आहे.

 

या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांचा आनंद स्पष्ट दिसोतय मात्र नेमके नाटक आहे सिनेमा  मालिका किंवा  आणखी काही वेगळे सरप्राईज देणार याबाबत त्यांनी खुलासा केला नसला तरी लवकर ती गोष्टही चाहत्यांच्या समोर येणार आहे. मात्र या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढली आहे हे मात्र नक्की. प्रशांत दामले आता काय खुशखबर देणार याकडेच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 


कोरोनाच्या संकटात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामलेंचा सन्मान

कोरोनामुळे नाट्यव्यवसायावर आलेलं सावट पाहता प्रशांत दामले यांनी आपल्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या रंगमंच कामगारांना या कठीण प्रसंगात मदतीचा हात देऊन समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्यामुळे प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल ह्याची अजून खात्री नाही पण तो पर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांना प्रशांत दामले यांनी केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आणि सामाजिक जबाबदारीचे भान दर्शवणारी आहे.

नाट्य व्यवसायासाठी शासनाकडून अपेक्षा करणे चुकीचे

विनोदी नाटकाबाबत ते म्हणाले, सकाळपासून झोपेपर्यंत लोकांना अनेक प्रकारचे टेन्शन असते. अशावेळी थिएटरमध्ये येणाऱ्या अशा दर्शकांना हसविणे आवश्यक आहे. विनोद हा एकाच प्रकारचा नसतो. व्यावसायिक नाटके अशीच असावीत, ज्यांना गंभीर आवडते त्यांच्यासाठी प्रायोगिक रंगभूमी आहे, असे मत त्यांनी मांडले. माझी आवड व व्यवसाय हाच असल्याने १२ हजाराच्यावर नाटक करू शकलो, अशी कबुली त्यांनी दिली. पाककृतीच्या शोबद्दल, स्वयंपाक ही एक कलाच असून गृहिणींची भावना त्यात गुंतली असल्याची भावना दामले यांनी व्यक्त केली होती.

Web Title: Prashant Damle All Set To Give Good News Soon Caught Everyone Attention On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.