प्रार्थना बेहरे घरात बसून करतेय हे काम, सोशल मीडियाद्वारे दिली चाहत्यांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 01:00 PM2021-04-12T13:00:03+5:302021-04-12T13:01:36+5:30

प्रार्थना बेहरेने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून ती सध्या घरात बसून काय करतेय हे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

prarthana behere shares cooking video on social media | प्रार्थना बेहरे घरात बसून करतेय हे काम, सोशल मीडियाद्वारे दिली चाहत्यांना माहिती

प्रार्थना बेहरे घरात बसून करतेय हे काम, सोशल मीडियाद्वारे दिली चाहत्यांना माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देप्रार्थनाचे हे रूप तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे महाराष्ट्रात शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणालाच आपल्या घरातून बाहेर देखील पडता येत नाहीये. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

प्रार्थना बेहरेने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून ती सध्या घरात बसून काय करतेय हे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. प्रार्थनाने तिचा जेवण करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात ती जेवण बनवताना दिसत आहे.

प्रार्थनाचे हे रूप तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

Web Title: prarthana behere shares cooking video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.