प्राजक्ता माळीच्या या किलर लूकला तुम्ही किती लाईक्स द्याल, फोटोशूट करत वेधले सा-यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 10:41 AM2020-06-23T10:41:52+5:302020-06-23T10:44:19+5:30

प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

Prajakta Mali sizzling pictures that will leave you mesmerised; Check out | प्राजक्ता माळीच्या या किलर लूकला तुम्ही किती लाईक्स द्याल, फोटोशूट करत वेधले सा-यांचे लक्ष

प्राजक्ता माळीच्या या किलर लूकला तुम्ही किती लाईक्स द्याल, फोटोशूट करत वेधले सा-यांचे लक्ष

googlenewsNext

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. 

प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.प्राजक्ताने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.  या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 

याआधीही प्राजक्ता माळीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. रसिकांकडून प्राजक्ताच्या या फोटोंना बरेच लाइक्सही मिळाले होते. प्राजक्ताचा सेन्सेशन्ल बोल्ड अंदाज रसिकांसमोर आला होता. तेव्हाही सोशल मीडियावर तिच्या फोटोची चर्चा रंगली  होती. 

यातील एका फोटोत प्राजक्ताचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात प्राजक्ताचा हा फोटो आहे. 

Web Title: Prajakta Mali sizzling pictures that will leave you mesmerised; Check out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.