अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्याशी लग्न केले आणि त्यानंतर त्या संसारात रमल्या. या दोघांना अनिकेत सराफ हा मुलगा आहे. त्याच्या जन्मानंतर निवेदिता केवळ मुलाला संपूर्ण वेळ देता यावा यासाठी चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्या. तब्बल 14 वर्ष ते चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या. बॉलिवूड अथवा मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टारची मुलं आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच क्षेत्रात करियर करताना दिसतात.

मात्र यासाठी अनिकेत सराफ हा अपवाद ठरला आहे. कारण अनिकेत हा व्यवसायाने शेफ आहे. फ्रांस येथे जावून त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे युट्यूबवर चॅनेल देखील आहे. यावर तो वेगेवगेळ्या खाद्यपदार्थ बनवण्याची रेसिपी टाकत असतो.गेल्या चार वर्षापासून तो हे काम करत आहे. अनिकेत काही वेळा त्याच्या आई वडिलांसोबत कार्यक्रमांना हजेरी नक्कीच लावतो. पण या क्षेत्राविषयी त्याला अजिबातच प्रेम नाहीये. 

आता त्याच जोमाने  निवेदिता पुन्हा आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत रसिकांचे मनोरंजन करत आहेत. अगदी अल्पावधीतच निवेदिता यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत आसावरी या व्यक्तिरेखेला देखील अफाट लोकप्रियता मिळतेय.

निवेदिता आणि अशोक यांच्या लग्नाचा किस्सा खूपच छान आहे. निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते. गोव्यात मंगेशीच्या देवळात त्या दोघांचे लग्न झाले. मंगेशी देवी अशोक सराफ यांची कुलदैवता असल्याने त्या दोघांनी गोव्याला जाऊन मंगेशीच्या देवळात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 
 


 

Web Title: Nivedita Saraf, who was away from filmmaking for almost 14 years, Read Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.