Mrinal Kulkarni : “प्रिय विराजस आता तरी..” ; मृणाल कुलकर्णी यांनी लेकाला दिला खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:51 IST2023-02-28T10:49:44+5:302023-02-28T10:51:27+5:30

Mrinal Kulkarni : ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याचा आज वाढदिवस.

Mrinal Kulkarni Writes A Special Post For son Virajas Kulkarni Birthday | Mrinal Kulkarni : “प्रिय विराजस आता तरी..” ; मृणाल कुलकर्णी यांनी लेकाला दिला खास सल्ला

Mrinal Kulkarni : “प्रिय विराजस आता तरी..” ; मृणाल कुलकर्णी यांनी लेकाला दिला खास सल्ला

‘माझा होशील ना’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याची आई व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनीही लेकाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. मृणाल यांनी विराजससाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लेकाला एका खास सल्लाही दिला आहे.

विराजसचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “प्रिय विराजस ,आमचा शहाणा मुलगा तर तू आहेसच,पण आता लग्नानंतर “बॅलन्सिंग ऍक्ट” पण तू मस्त पार पाडतो आहेस. यावर्षी तुझा पहिला सिनेमा रिलीज झाला, त्याला यश मिळाले , सर्व थरातील लोकांनी त्याची नोंद घेतली, याचा खूप अभिमान वाटतो. तू येणाऱ्या वर्षी जे जे प्लॅन केलं आहेस ते सर्व उत्तम रीतीने पार पडो आणि त्यात तुला भरघोस यश मिळो. शिवानी आणि तुला खूप प्रेम …Happy Birthday!!! PS : आता तरी थोडासा केक खायला लाग ! आई – बाबा.”
मृणाल यांनी लेकासाठी लिहिलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी  एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी कामगिरी करणारा विराजस ‘माझा होशील ना’ या मालिकेनं घराघरांत पोहोचला. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातही काम केलं. याचवर्षी त्याचा पहिला सिनेमा व्हिक्टोरिया रिलीज झाला. या रहस्यपटाचं दिग्दर्शन विराजसने केलं होतं. या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.   

Web Title: Mrinal Kulkarni Writes A Special Post For son Virajas Kulkarni Birthday