उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:29 PM2021-09-15T15:29:02+5:302021-09-15T15:30:48+5:30

Urmila nimbalkar : उर्मिलाने पहिल्यांदाच तिच्या बाळाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या बाळाचे तीन भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

marathi actress youtuber urmila nimbalkar share her baby's first photo on social media | उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; म्हणाली...

उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; म्हणाली...

Next
ठळक मुद्दे"आणि एक गोंडस बाळ.."; उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

प्रसिद्ध युट्यूबर आणि मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने urmila nimbalkar काही दिवांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली', असं ती म्हणाली होती. तेव्हापासून तिच्या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. विशेष म्हणजे चाहत्यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या उर्मिलाने पहिल्यांदाच तिच्या बाळाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या बाळाचे तीन भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

पुण्यातील ढेपेवाडा येथे राजेशाही थाटात डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करणाऱ्या उर्मिलाने ३ ऑगस्ट रोजी एका गोड मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे प्रेग्नंसी काळात आणि डिलिव्हरी झाल्यानंतरही ती चाहत्यांच्या संपर्कात होती. यावेळी तिने तिच्या गरोदरपणातील काही आठवणी, अनुभव शेअर केले. त्यानंतर आता तिने पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर केला आहे. 

उर्मिलाने सोशल मीडियावर बाळासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बाळाला छान सुती कापडामध्ये गुंडाळलं आहे. "उर्मिला आणि एक गोंडस बाळ! बाळाबरोबरचा पहिला फोटो, मला कधी कधी विश्वासच बसत नाही,ही गुंडाळलेली अळी, हा एक बरीटो, माझा आहे", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये बाळाचा चेहरा जरी दिसत नसला तरीदेखील बाळाच्या आगमनाने उर्मिलाचा चेहरा मात्र चांगलाच खुलल्याचं दिसून येत आहे.

The Kapil Sharma Show: चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक; संपत्ती ऐकून व्हाल थक्क

दरम्यान, उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्नगाठ बांधली. या वर्षी एप्रिल महिन्यात तिने पतीसोबतचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली. उर्मिला आणि सुकिर्त यांची एका थिएटर ग्रुपद्वारे पहिल्यांदा ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुकिर्त हा पेशाने पत्रकार असून एका पब्लिकेशनसाठी तो काम करतो.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: marathi actress youtuber urmila nimbalkar share her baby's first photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app