'दौलतरावां'साठी उर्मिलाची खास पोस्ट; आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 01:57 PM2022-05-13T13:57:58+5:302022-05-13T13:58:50+5:30

Urmila kothare: अलिकडेच उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो जुना असून त्यात तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

marathi actress Urmila kothare share Special Birthday post for adinath kothare | 'दौलतरावां'साठी उर्मिलाची खास पोस्ट; आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली...

'दौलतरावां'साठी उर्मिलाची खास पोस्ट; आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली...

Next

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर केवळ चंद्रमुखी आणि दौलतराव या दोन नावांचीच चर्चा आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (adinath kothare) यांची मुख्य भूमिका असलेला चंद्रमुखी (Chandramukhi) हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित या चित्रपटात या दोन्ही कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली असून गेल्या काही दिवसांपासून ही जोडी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. त्यामुळे अभिनेता आदिनाथ कोठारेला त्याचा वाढदिवस साजरा करण्याचाही वेळ मिळाला नाही. मात्र, त्याचा हा खास दिवस त्याची पत्नी, अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे  (Urmila kothare)हिने अविस्मरणीय केला आहे.

आदिनाथ आणि उर्मिला या जोडीकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. या दोघांमध्ये असलेलं प्रेम, आदर, त्यांच्या नात्याची खोली प्रत्येक क्षणी प्रेक्षकांना दिसून येते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तर उर्मिला तिच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत व्यस्त होती. परंतु, या सगळ्यातून थोडासा वेळ काढत तिने आदिनाथला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अलिकडेच उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो जुना असून त्यात तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच त्यांच्याती नातं किती घट्ट आणि खोलवर रुजलेलं आहे हे सांगितलं आहे.

काय आहे उर्मिलाची पोस्ट?

उर्मिलाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती आणि आदिनाथ पॅराग्लाइडिंग करताना दिसत आहेत. "आपण एकत्र उडी मारली, भरारी घेतली आणि आपल्याला ठावूक होतं आपण पुन्हा एकत्र भेटू आणि तसंच झालं", असं उर्मिला म्हणाली. 

पुढे ती म्हणते, "जुन्या अमूल्य आठवणींना एक उजाळा. आदिनाथ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात कायम अशीच भरारी घे आणि तुझ्या ध्येयापेक्षाही पुढचं यश संपादन कर. माझी साथ, माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत आहेत."

दरम्यान, आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज आहे.  'शुभ मंगल सावधान' या चित्रपटादरम्यान या दोघांची भेट झाली. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली होती. तेव्हा आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११ मध्ये लग्न केले.

Web Title: marathi actress Urmila kothare share Special Birthday post for adinath kothare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app