ठळक मुद्देसाडीत स्पृहाचे सौंदर्य खुलून आले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. स्पृहा या फोटोत खूपच सुंदर दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय छोट्या पडद्यावरील मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. नुकताच स्पृहाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

स्पृहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टायलिश अंदाजातील तिचे फोटो शेअर केले असून या फोटोत स्पृहाने साडी घातली आहे. साडीत स्पृहाचे सौंदर्य खुलून आले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. स्पृहा या फोटोत खूपच सुंदर दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे.

स्पृहाने काहीच दिवसांपूर्वी खूपच छान हेअरस्टाईल केली असून तिच्या चाहत्यांना तिचा हा हटके अंदाज आवडत आहे. स्पृहाने तिचे केस मानेपर्यंत शॉर्ट केले आहेत. तिच्या नव्या लूकमधील फोटो पोस्ट करत माझा हा नवा लूक तुम्हाला कसा वाटतोय असे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना विचारले होते. स्पृहाच्या या फोटोला तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिसाद दिला असून हा फोटो हजारोच्या संख्येने लोकांनी लाईक केला होता. अनेकांनी या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. या फोटोत तू खूप छान दिसत आहेस, तुझा नवा लूक खूपच छान आहे असे तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटच्या माध्यमातून सांगितले होते. 

स्पृहा अभिनयासोबतच एक चांगली लेखिका आणि उत्तम कवियत्री आहे. छोट्या पडद्यावरील बच्चे कंपनीच्या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मने जिंकली आहेत. अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत.

तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. मराठी चित्रपटात आपली एक ओळख बनवल्यानंतर स्पृहा दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील आपले भाग्य आजमावणार आहे.


Web Title: marathi actress spruha joshi saree picture
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.