ठळक मुद्देसारा गरोदर असून तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो तिनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. सारा या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडत आहेत.

झी मराठीवरील पिंजरा ही मालिका तुम्हाला आठवत असेलच ना... या मालिकेत भुषण प्रधान, संस्कृती बालगुडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच या मालिकेत सारा श्रवण एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पिंजरा या मालिकेनंतर तिने 'अनोळखी', 'तू तिथे मी' या अनेक मालिकांमध्ये काम केले. याशिवाय 'एकापेक्षा एक' या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये आपल्या डान्सचीही तिने झलक दाखवली. होती. तिच्या अभिनयासोबतच नृत्याची या कार्यक्रमामुळे चांगलीच चर्चा झाली होती. 

साराने मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या चित्रपटांमधील भूमिका देखील तिच्या चाहत्यांना भावल्या आहेत. पण प्रेक्षकांची लाडकी सारा गेल्या काही महिन्यांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. सारा सध्या कोणत्याही मालिकेत अथवा चित्रपटात काम न करण्यामागे एक खास कारण आहे. सारा सध्या तिच्या आयुष्यातील सगळ्यात चांगला क्षण एन्जॉय करत आहे.

सारा गरोदर असून तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो तिनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. सारा या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडत आहेत. तिला या फोटोद्वारे तिचे चाहते शुभेच्छा देत असून तिच्या फोटोंना भरभरून लाइक्स देत आहेत. 

सारानेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे तिची ही गुड न्यूज सगळ्यांना सांगितली होती. तिने तिचे पती गणेशसोबतचा फोटो पोस्ट करत तिच्या घरात एका चिमुकल्याचे आगमन होणार असल्याचे इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटले होते. 

साराने २४ एप्रिल २०१४ मध्ये गणेश सोनावणेसोबत लग्न केले होते. गणेश त्यावेळी हंगामा डिजिटल मीडियामध्ये काम करत होता. सारा आणि गणेश यांनी तीन वर्षांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगितली होती. 


Web Title: Marathi Actress Sara Shrawan baby shower pictures
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.