करिअरच्या सुरुवातीला अशी दिसायची सई ताम्हणकर; नॉन ग्लॅमरस फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 12:59 PM2022-01-16T12:59:41+5:302022-01-16T13:00:34+5:30

Sai tamhankar: आज ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून चर्चेत येणारी सई एकेकाळी प्रचंड साधी आणि नॉन ग्लॅमरस दिसायची. सध्या सोशल मीडियावर सईचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

marathi actress sai tamhankar old days photo viral on social media | करिअरच्या सुरुवातीला अशी दिसायची सई ताम्हणकर; नॉन ग्लॅमरस फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

करिअरच्या सुरुवातीला अशी दिसायची सई ताम्हणकर; नॉन ग्लॅमरस फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

Next

सई ताम्हणकर (Sai tamhankar) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून कायम सईकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सईने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. परंतु, आज ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून चर्चेत येणारी सई एकेकाळी प्रचंड साधी आणि नॉन ग्लॅमरस दिसायची. सध्या सोशल मीडियावर सईचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून ही सईच आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात. यात अनेकदा ही सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या जीवनातील लहान-लहान अपडेटही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात खासकरुन त्यांच्या बालपणीचे, कॉलेज जीवनातील फोटोही ते शेअर करतात. असेच काही फोटो सईने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सई प्रचंड वेगळी दिसत आहे. 

दरम्यान, सई ताम्हणकरने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात 'कांदेपोहे', 'तू ही रे', 'दुनियादारी', 'वजनदार', 'क्लासमेट', 'प्यारवाली लव्हस्टोरी','अश्लील उद्योग', 'मिमी' अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. 
 

Web Title: marathi actress sai tamhankar old days photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app