Photos: प्रचंड मोठी आहे अलका कुबल यांची फॅमिली; पाहा कोणकोण आहे त्यांच्या कुटुंबात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:57 PM2022-01-24T13:57:40+5:302022-01-24T14:02:20+5:30

Alka kubal: रुपेरी पडदा गाजवणारी ही अभिनेत्री कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. अलिकडेच त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे.

marathi actress alka kubal family photo | Photos: प्रचंड मोठी आहे अलका कुबल यांची फॅमिली; पाहा कोणकोण आहे त्यांच्या कुटुंबात

Photos: प्रचंड मोठी आहे अलका कुबल यांची फॅमिली; पाहा कोणकोण आहे त्यांच्या कुटुंबात

Next

'माहेरची साडी', 'लेक चालली सासरला', 'वहिनीची माया', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. उत्तम अभिनयशैली, स्वभावातील नम्रपणा आणि साधेपणा यामुळे अलका कुबल यांनी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. रुपेरी पडदा गाजवणारी ही अभिनेत्री कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. अलिकडेच त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे.

अलका कुबल (alka kubal) यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर त्यांचं कुटुंब किती मोठं आहे याचा अंदाज लावता येतो. यात त्यांच्या पती, मुलींशिवाय घरातील अन्य सदस्यही दिसून येत आहे.

थाटात पार पडला अलका कुबल यांच्या लेकीचा लग्नसोहळा; पाहा लग्नाचा अल्बम

दरम्यान, अलिकडेच अलका कुबल यांच्या लेकीचं इशानीचं लग्न पार पडलं. दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत इशानीने लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलका कुबल अजूनही कलाविश्वात सक्रीय आहे. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. अलिकडेच त्या 'आई माझी काळुबाई' या मालिकेत झळकल्या होत्या.

Web Title: marathi actress alka kubal family photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app