थाटात पार पडला अलका कुबल यांच्या लेकीचा लग्नसोहळा; पाहा लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 10:19 AM2022-01-24T10:19:26+5:302022-01-24T10:24:19+5:30

Alka kubal athalye: अलका कुबल यांनी इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत. इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. येथेच तिची आणि निशांतची ओळख झाली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अलका कुबल यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

'माहेरची साडी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अलका कुबल यांचा कलाविश्वात स्वतंत्र चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या अलका कुबल यांच्या लेकीचं इशानीचं नुकतंच लग्न झालं असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इशानीने दिल्लीतील निशांत वालिया याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

इशानीच्या लग्नसोहळ्याचे फोटो अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसंच अलका कुबल यांनीही त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे फोटो पोस्ट केले आहेत.

इशानी आणि निशांत यांच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

या लग्नसोहळ्यात मिलिंद गवळी, किशोरी शहाणे आणि तिचे पती, अर्चना नेवरेकर, स्मिता जयकर, प्राजक्ता दिघे, निर्मिती सावंत ही कलाकार मंडळी उपस्थित होती.

काही दिवसांपूर्वीच इशानी आणि निशांतची रोका सेरेमनी पार पडली होती. त्यानंतर नवीन वर्षात त्यांचा लग्नसोहळाही पार पडला.