'या' कलाकाराला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:30 PM2021-09-17T17:30:00+5:302021-09-17T17:30:00+5:30

Samir choughule : २० वर्षांचा असताना तो कसा दिसायचा हे त्याने या फोटोच्या माध्यमातून सांगितलं आहे.

marathi actor samir choughule Young photo | 'या' कलाकाराला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन

'या' कलाकाराला ओळखलं का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून करतोय प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन

Next
ठळक मुद्देसोशल मीडियावर चर्चेत येत असलेला फोटो अभिनेता, लेखक समीर चौगुले याचा आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच या माध्यमाचा वापर करुन सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. यात अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या जीवनातील लहानमोठे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात बऱ्याचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षणदेखील चाहत्यांसोबत शेअर करतात. म्हणूनच, कलाकारांनी शेअर केलेल्या कोणत्याही व्हिडीओ किंवा फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. यामध्ये सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधील एका कलाकाराची चर्चा होत आहे.

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणेच भासतो. या कलाकारांपैकीच एका कलाकाराने त्याच्या तरुणपणातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर अनेकांना तो ओळखणं कठीण झालं आहे.

हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला? चाहत्याचा समीर चौगुलेला थेट प्रश्न

सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला फोटो अभिनेता, लेखक समीर चौगुले याचा असून त्याने इन्स्टाग्रामवर तो शेअर केला आहे. समीर २० वर्षांचा असताना तो कसा दिसायचा हे त्याने या फोटोच्या माध्यमातून सांगितलं आहे. सोबतच कॉलेजजीवनातील एक आठवणी म्हणूनही त्याने हा फोटो जपून ठेवला आहे.

दरम्यान, अभिनेता समीर चौगुले हा आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्याच्या याच साधेपणामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 
 

Web Title: marathi actor samir choughule Young photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app