"मी त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी गेले तेव्हा..."; रवींद्र महाजनींबद्दल 'त्या' महिलेचा महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 04:00 PM2023-07-15T16:00:33+5:302023-07-15T16:00:50+5:30

Ravindra Mahajani Passes Away : महाजनी यांच्या बिल्डिंगमध्ये कचरा वेचणाऱ्या महिलेने दिली माहिती

marathi actor ravindra mahajani passed away building women talk about his leg injury | "मी त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी गेले तेव्हा..."; रवींद्र महाजनींबद्दल 'त्या' महिलेचा महत्त्वाचा खुलासा

"मी त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी गेले तेव्हा..."; रवींद्र महाजनींबद्दल 'त्या' महिलेचा महत्त्वाचा खुलासा

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. शुक्रवारी (१४ जुलै) सायंकाळी चारच्या सुमारास बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या अकस्मिक निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगावला फ्लॅटमध्ये एकटे राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर दोन दिवसांपासून खोलीचा दरवाजा बंद असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. यात एक बाब म्हणजे, रवींद्र महाजनी यांच्या बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या व कचरा वेचणाऱ्या महिलेने त्यांच्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला.

काय म्हणाली 'ती' महिला?

“मी त्यांच्याकडे रोज कचरा घेण्यासाठी जायचे. आमचं थोडं फार बोलणंही व्हायचं. मंगळवारी त्यांनी माझ्या हातात कचरा दिला. गुरूवारी माझी सुट्टी असल्याने मी कामावर गेले नव्हते. शुक्रवारी सकाळी मी कचरा घेण्यासाठी त्यांचा दरवाजा वाजवला, पण त्यांनी दार उघडलं नाही. ते झोपले असतील, असं वाटलं म्हणून मी निघून गेले. त्यानंतर दुपारी पुन्हा मी त्यांचा दरवाजा वाजवला. तेव्हाही आतून काहीच आवाज आला नाही. ते घरात एकटेच राहायचे. त्यांच्या घराचं दारही कधी उघडं नसायचं. ते आजारी नव्हते. पण, त्यांच्या पायाला जखम झाल्याचं मी पाहिलं होतं. डॉक्टरांकडे जाऊन या असं मी त्यांना सांगितलंही होतं. तेव्हा त्यांनी, 'मी नक्की जाईन', असं म्हटलं होतं,” असा महत्त्वाचा खुलासा त्यांच्या बिल्डिंगमधील कचरा वेचणाऱ्या महिलेने वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

“गश्मीरने माझ्या ‘देवता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये...”, रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केलेली इच्छा

दरम्यान फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून पोलिस घरात गेले त्यावेळी रवींद्र महाजनी त्यांना मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनही कळलेलं नाही. मृतदेहाच्या शवविच्छेजनानंतर याचं नक्की कारण कळेल. या दरम्यान, त्यांच्या पायाला झालेली दुखापत हा एक महत्त्वाचा पैलू मानला जात आहे.

“मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही, पण...”, गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

रवींद्र महाजनी यांनी ७० ते ९०चं दशक गाजवलं. मराठी सिनेसृष्टीतील देखणा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. देवता, ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’,  ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी धक्का बसला.

Web Title: marathi actor ravindra mahajani passed away building women talk about his leg injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.