काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी गायलेले  एक नवं गाणं यू ट्यूबवर प्रदर्शित झालं. 'तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या' असे या गाण्याचे बोल आहेत. 
त्यानंतर, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी तर थेट सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत अमृता फडणवीस यांच्या गायकीची खिल्लीच उडवली होती. आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?, असा प्रश्न त्यांनी केला होता.

मात्र महेश टिळेकरांनी सोशल मीडियावर वापरलेली भाषा आणि अशा प्रकारे खिल्ली उडवणे अभिनेता आरोह वेलणकरला खटकले आणि त्यानेही महेश टिळेकरांना उत्तर देत आपला राग व्यक्त केला होता. आरोहने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ''महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!? ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर  अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा... राहीला प्रश्ण मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतय बघू!''

आरोहची ही पोस्ट पाहून महेश टिळेकर पुन्हा संतपाले आहेत. त्यांनीही आरोहला उत्तर देत रागाच्या भरात पुन्हा पोस्ट शेअर केली आहे.  '' बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन  मला सांगतोय.कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. आणि फुटेज पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास ना?का तिथे समाजसेवा करायला गेला होतास?ज्या कलाकारांच्या वर टीका केली  तेंव्हा का तू बिळात जाऊन बसला होतास?ते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का? जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेन नी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान  तू ज्यांचा भक्त आहेस त्या  राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेंव्हा तुझे रक्त उसळले नाही का?तेंव्हा कलाकारां ची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रे?कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास?

तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे.  आता तुझा जळफळाट होतोय तेंव्हा कुठं गेला होतास रे तु,जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा , महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेंव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेनाऱ्यातला मी नाही.आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास,ते विसरलास का?जिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे 👍म्हणजे माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो  तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयवा मधून बाहेर येत आहे ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल''.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mahesh tillekar and aroh welankar criticize each other over new song of amruta fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.