कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. ते आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपले चित्रीकरणादरम्यानचे फोटो, खाजगी आयुष्यातील फोटो पोस्ट करत असतात. तसेच ते त्यांच्या आगांमी प्रोजेक्टबद्दल सांगतात. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धक किशोरी शहाणेने इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून ती भोपाळमध्ये असल्याचं समजतं आहे.

किशोरी शहाणेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटलं की, शुभ सकाळ भोपाळ. नवीन हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगसाठी भोपाळला गेली आहे.

किशोरी शहाणे बिग बॉस मराठी २ या रिॲलिटी शोमध्ये आपल्याला दिसली होती. तिने या कार्यक्रमात फायनलपर्यंत मजल मारली होती.

किशोरी शहाणे शाळेत असताना त्यांनी 'दुर्गा झाली गौरी' या नृत्यनाटिकेत काम केले होते. त्‍यानंतर मग राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्याचदरम्यान त्यांनी वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शतुरमुर्ग' या हिंदी नाटकात काम केले. असे करता करता मग 'मोरूची मावशी' या व्‍यावसायिक नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. 

‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सचिन पिळगावकर यांच्या ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटात काम केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले असून त्यांची जोडी विशेष करून अशोक सराफ यांच्यासोबत गाजली. 


किशोरी शहाणे यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. तसेच अनेक हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले. 


Web Title: Kishori Shahane shared video on instagram, she shooting in Bhopal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.