Great, Grand, Selfie, shared with Prajakta Mali, Ladies Actress | प्राजक्ता माळीने शेअर केला ग्रेट,ग्रँड,सेल्फी, पाहा कुठे भटकंती करतेय रसिकांची लाडकी अभिनेत्री
प्राजक्ता माळीने शेअर केला ग्रेट,ग्रँड,सेल्फी, पाहा कुठे भटकंती करतेय रसिकांची लाडकी अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतंच तिने शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय.

 

प्राजक्ताने इजिप्तच्या गिझा इथल्या पिरॅमिडसमोर काढलेला सेल्फी तिच्या फॅन्सना भावतो आहे. “आजपर्यंतचा ग्रेट, ग्रँड, अभिमानास्पद सेल्फी” अशी प्रतिक्रिया तिने या सेल्फीसह शेअर केली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या गिझा इथल्या पिरॅमिडसह सेल्फी काढल्याचा आनंद प्राजक्ताच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. अभिनयासोबतच तिला भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते.

काही दिवसांपूर्वी तिचे युरोप टूरचे फोटोही चर्चेचा विषय ठरले होते. यानंतर ती आता इजिप्तमध्ये भटकंती करत आहे. यावेळी तिने गिझा इथल्या प्रसिद्ध पिरॅमिडला भेट दिली. प्राजक्ताच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत . 


Web Title: Great, Grand, Selfie, shared with Prajakta Mali, Ladies Actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.