ठळक मुद्देअक्षयने  फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप  या मराठी चित्रपटांत काम केले आहे.

बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारे  बाबा होणार आहे. होय, अक्षयची बेटरहाफ योगिता गवळी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळीची मुलगी आहे, हे तुम्ही जाणताच. त्यामुळे अरूण गवळी लवकरच आजोबा होणार आहे. काल ‘डॅडी’च्या लेकीच्या डोहाळ जेवणाचा सोहळा पार पडला. याचा डोहाळे जेवणाचा व्हिडीओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहुणा घरी येणार येणार ग... असे लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात योगिता लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. फुलांच्या दागिण्यांनी सजलेली योगिता अतिशय सुंदर दिसतेय.


 
8 मे 2020 रोजी अक्षय व योगिता यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला होता.  अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान  कुटुंबीयांनी दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

अक्षयने  फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप  या मराठी चित्रपटांत काम केले आहे. ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमात अक्षयने  सरदार कोयाजी नाईक बांदल यांची भूमिका साकारली होती. योगिता ही एक एनजीओ चालवते. या माध्यामातून महिलांच्या आरोग्यासाठी ती काम करते. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: gangster arun gawli daughter and actor akshay waghmares wife yogita baby shower video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.