भाग्यश्री मोटे झाली रोमाँटिक म्हणते, ये जो हल्का हल्का सुरूर है

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:29 AM2020-03-07T11:29:56+5:302020-03-07T11:30:01+5:30

लवकरच ती एक मराठी सिनेमात दिसणार आहे.

Bhagyashree mote share her glamours photo on instagram gda | भाग्यश्री मोटे झाली रोमाँटिक म्हणते, ये जो हल्का हल्का सुरूर है

भाग्यश्री मोटे झाली रोमाँटिक म्हणते, ये जो हल्का हल्का सुरूर है

googlenewsNext

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. भाग्यश्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमसर फोटोशूट शेअर केले आहे. गडद निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये भाग्यश्री खूपच हॉट दिसतेय. यातल्या एक फोटोला भाग्यश्रीने हिंदी गाण्यातील ओळ कॅप्शन म्हणून दिली आहे.''ये जो हल्का हल्का सुरूर है, तेरे इश्क का ही फितूर'' असे कॅप्शन तिने दिले आहे. भाग्यश्रीच्या या हॉट अदांवर सध्या फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. लवकरच भाग्यश्री एक मराठी सिनेमात दिसणार आहे. याची माहिती काही दिवसांपूर्वी तिने स्वत:च दिली होती.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.


भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Bhagyashree mote share her glamours photo on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.