बाईपण भारी देवा! कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क, केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 03:40 PM2023-07-07T15:40:49+5:302023-07-07T15:41:27+5:30

30 जून रोजी 'बाईपण भारी देवा' रिलीज झाला.

baipan bhari deva box office collection 12.50 cr in just 7 days kedar shinde posts | बाईपण भारी देवा! कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क, केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

बाईपण भारी देवा! कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क, केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

googlenewsNext

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) सिनेमा सध्या बॉक्सऑफिस गाजवतोय. या बायकांनी एकत्र येत जी काही धमाल केली आहे ती आता पडद्यावर दिसत आहे. प्रेक्षकही त्यांची ही मस्ती अनुभवत आहेत. चांगल्या सिनेमाला प्रेक्षक नक्कीच प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 'बाईपण भारी देवा' सिनेमाने एका आठवड्यातच तब्बल 12.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर करत आयुष्यातील सर्व महिलांचे आभार मानलेत.

30 जून रोजी 'बाईपण भारी देवा' रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने 1 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर विकेंडला सिनेमाने ३ दिवसांत ६ कोटी रुपये कमावत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. मराठी सिनेमाने घेतलेली ही झेप नक्कीच वाखणण्याजोगी आहे. सधअया चित्रपटगृहात अगदी २०-४० च्या ग्रुपने बायका सिनेमा बघायला जात आहे. सिनेमात दाखवण्यात आलेल्या या बायकांची कहाणी प्रत्येकाला आपलीच कहाणी वाटत आहे. त्यामुळे थिएटरमध्ये महिलांची एकच गर्दी होत आहे. त्यात अनेक बायका या दोनदा तीनदा सिनेमा बघण्यासाठी येत आहेत.

रोहिणी हट्ट्ंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. या सर्व सहा जणी 'काकडे सिस्टर्स' असून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. सख्ख्या बहिणी असूनही बऱ्याच दिवसांनी सगळ्या एकत्र भेटतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. त्यांचे आपापसातील काही लहानपणापासूनचेच वाद आहेत जे पुन्हा ताजे होतात.मंगळागौर स्पर्धेसाठी सहा बहिणी एकत्र येतात आणि पुढे काय धम्माल होते हे सिनेमात दाखवलं आहे. एकंदरच उत्तम पटकथा, कमाल दिग्दर्शन, गाणी आणि अफलातून अभिनय यामुळे सिनेमा सरळ मनाला भिडताना दिसतो.

Web Title: baipan bhari deva box office collection 12.50 cr in just 7 days kedar shinde posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.