अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यानंतर ती कागर सिनेमात झळकली. आता ती लवकरच मेकअप चित्रपटात पहायला मिळणार आहे. 


सैराट चित्रपटानंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पहायला मिळाला. तिने तब्बल २० किलो वजन घटविले आहे. तिने हे वजन कसं घटविले, हे एका मुलाखतीत सांगितलं.
सैराटनंतर रिंकू राजगुरूच्या लक्षात आलं की आपल्याला आता वजन घटवावे लागेल. तिलाही फिटनेसचं महत्त्व पटलं आणि अखेर तिने वजन घटविण्याचे मनावर घेतले.

तिने सांगितलं की, दररोज पहाटे ४ वाजता उठून व्यायाम करायचे ठरविले आणि त्यानंतर वॉर्मअप करू लागली. इतकंच नाही तर तिने व्यायामासोबत डाएटकडेही भर दिला. रिंकू सकाळ आणि संध्याकाळी डाएट फॉलो करते. ती जास्त भर हा सलाडवर देते. त्याचप्रमाणे तिला गोड आवडतं पण वजन कमी करण्यासाठी तिने गोड खाणंही सोडून दिलं. 


जवळपास रिंकू राजगुरू हिने २० किलो वजन घटविले आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने वजन घटविण्यासाठी कोणताही ट्रेनर ठेवला नाही. तिची ट्रेनर व डाएटिशियन म्हणून तिच्या आईनेच पाहिलं. तिच्या आईनेच तिच्या खाण्यापिण्याची आणि तिच्या व्यायामाची काळजी घेतली.

रिंकूला प्रत्येक गोष्टीत आईने मदत केल्याचं तिने सांगितलं आहे. या सगळ्याचा फायदा केवळ दोन महिन्यात तिने तब्बल वीस किलो वजन घटवल्याचंही तिने सांगितलं. 

Web Title: Archie alias Rinku Rajguru has reduced his weight by 5 kg, shared diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.