ठळक मुद्देअभिनेता अंशुमन विचारेची मुलगी अन्वी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे विविध व्हिडिओ तो फेसबुकला शेअर करत असतो आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात.

बॉलिवूडमध्ये आज अनेक कलाकारांची मुलं जन्माला येताच तुफान पब्लिसिटी मिळवताना दिसतात. यात नवाब सैफ अली खानचा आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर आघाडीवर आहे. या स्टार किडसनाही टक्कर देणारे मराठीतील स्टार किडसचे व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता मराठी कलाकारांच्या चिमुकल्यांनी सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घातला आहे. त्यांचे व्हिडीओ पाहून चाहतेही रिफ्रेश झाले आहेत. आता एका अभिनेत्याच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेता अंशुमन विचारेची मुलगी अन्वी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे विविध व्हिडिओ तो फेसबुकला शेअर करत असतो आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. सध्या लॉकडाऊन असल्याने बाहेर पडायचे नाही असे अन्वी व्हिडिओत सांगत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Posted by Anshuman Vichare on Sunday, April 18, 2021

अन्वी या व्हिडिओत तिच्या आई-बाबांना सांगताना दिसत आहे की, बाहेर लॉकडाऊन असल्याने कोणीही बाहेर जायचे नाही. बाहेर गेलात तर पोलीस पकडतील.... अन्वीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकजणांनी पाहिला असून या व्हिडिओवर नेटिझन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. 'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोर्चा या सिनेमाद्वारे त्याने गायनाच्या क्षेत्रात देखील प्रवेश केलेला आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anshuman vichare daughter anvi video got viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.