अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांच्या 'वेल डन बेबी' सिनेमाचा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:03 PM2021-03-31T15:03:28+5:302021-03-31T15:06:41+5:30

ट्रेलरमध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याच्या कथेची झलक आहे.

Amrita khanwilkar and pushkar Jog's 'Well Done Baby' movie trailer out | अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांच्या 'वेल डन बेबी' सिनेमाचा ट्रेलर आऊट

अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांच्या 'वेल डन बेबी' सिनेमाचा ट्रेलर आऊट

googlenewsNext

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आज वेल डन बेबी या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. हा सिनेमा  पाडव्याच्या काही दिवस आधी म्हणजेच 9 एप्रिल 2021 रोजी पाहायला मिळणार आहे. प्रियंका तनवर यांचे दिग्दर्शन असलेल्या या फॅमिली ड्रामामध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यासारखे लोकप्रिय मराठी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

या ट्रेलरमध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याच्या कथेची झलक आहे. हे जोडपं आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नशीबच त्यांना बाळाच्या रुपात तो उद्देश देऊ करते. आदित्य आणि मीरा (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) यांचं आयुष्य आणि नवरा-बायको म्हणून त्यांच्यासमोरील आव्हाने यात डोकावण्याची संधी या ट्रेलरमुळे मिळते. आधीच गुंतागुंत झालेल्या या नात्यात भर पडते आदित्यच्या सासूची. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या काहीशा सगळ्यात लुडबुड करणाऱ्या सासूमुळे ही कथा अधिकच रंजक आणि गमतीशीर बनली आहे.

वेल डन बेबी प्रदर्शित होत असल्याची नुकतीच झालेली घोषणा आणि त्यापाठोपाठ आलेला ट्रेलर यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता फारच वाढली आहे. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असलेला हा सिनेमा व्हिडीओ पॅलेसने सादर केला आहे. 

Web Title: Amrita khanwilkar and pushkar Jog's 'Well Done Baby' movie trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.