adinath kothare and abhinay berde childhood picture with mahesh kothare | या फोटोत महेश कोठारे यांच्या कडेवर असलेला मुलगा आहे आदिनाथचा भाऊ आणि प्रसिद्ध अभिनेता
या फोटोत महेश कोठारे यांच्या कडेवर असलेला मुलगा आहे आदिनाथचा भाऊ आणि प्रसिद्ध अभिनेता

ठळक मुद्देया फोटोत आपल्याला शालेय जीवनातील आदिनाथ पाहायला मिळत आहे. त्याचसोबत या फोटोत त्याच्यासोबत महेश कोठारे दिसत असून त्यांच्या कडेवर एक लहान मुलगा आहे.या फोटोत असलेला हा चिमुकला अभिनय असून अभिनयच्या दुसऱ्या वाढदिवसाला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरात हा काढलेला फोटो आहे. त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या वेळीच दिवाळी देखील आली असल्याने दिवाळी पार्टी आणि अभिनयचा वाढदिवस अशा दोन गोष्टींचे सेलिब्रेशन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यावेळी दणक्यात केले होते.

आदिनाथ कोठारेचे प्रचंड चाहते असून तो सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या संपर्कात राहात असतो. तो त्याचे, त्याच्या कुटुंबियाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतो आणि त्याच्या या फोटोंना त्याचे फॅन्सदेखील भरभरून प्रतिसाद देतात. आदिनाथने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत आपल्याला शालेय जीवनातील आदिनाथ पाहायला मिळत आहे. त्याचसोबत या फोटोत त्याच्यासोबत महेश कोठारे दिसत असून त्यांच्या कडेवर एक लहान मुलगा आहे. 

आदिनाथने शेअर केलेल्या या फोटोसोबत त्याने खूप छान कॅप्शन देखील लिहिली आहे. त्याने या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या फोटोत माझ्यासोबत माझा लहान भाऊ असून ते दिवस खूपच छान होते. या कॅप्शनमध्ये त्याने अभिनय बेर्डेला टॅग केले आहे. या फोटोत असलेला हा चिमुकला अभिनय असून अभिनयच्या दुसऱ्या वाढदिवसाला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरात हा काढलेला फोटो आहे. त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या वेळीच दिवाळी देखील आली असल्याने दिवाळी पार्टी आणि अभिनयचा वाढदिवस अशा दोन गोष्टींचे सेलिब्रेशन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यावेळी दणक्यात केले होते. हा फोटो आदिनाथसोबतच अभिनयने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

महेश कोठारे यांच्या कडेवर असलेला अभिनय खूपच गोड दिसत असून आदिनाथचा देखील एक वेगळाच अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे. हा फोटो आदिनाथ आणि अभिनयच्या फॅन्सना खूप आवडला असून या फोटोला खूप सारे लाईक्स मिळाले आहेत. अभिनयने लव्ह यू म्हणत या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे तर त्याची बहीण स्वानंदीने त्या खूप चांगल्या आठवणी होत्या असे म्हटले आहे. या फोटोत आदिनाथ कोठारे आणि अभिनय बेर् खूपच छान दिसत असल्याचे त्यांचे फॅन्स आवर्जून प्रतिक्रियांच्या द्वारे सांगत आहेत.  

 

Web Title: adinath kothare and abhinay berde childhood picture with mahesh kothare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.