आस्ताद काळे म्हणतोय काम देता का कुणी काम ?,सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 01:37 PM2020-12-02T13:37:58+5:302020-12-02T13:38:24+5:30

कोरोना आणि लॉकडाऊनमुळं एकंदर सर्वच क्षेत्रात कामाच्या संधींवर परिणाम झालेला दिसून येत आहे. याला मनोरंजन क्षेत्र देखील अपवाद नाहीए.

Actor Astad kale Searching For Work In Industry Share Post On Facebook | आस्ताद काळे म्हणतोय काम देता का कुणी काम ?,सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष

आस्ताद काळे म्हणतोय काम देता का कुणी काम ?,सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष

googlenewsNext


अभिनेता आस्ताद काळे हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेला आस्ताद उत्तम गायकही आहे. नुकतेच‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमाचा नुकताच ग्रॅंड फिनाले सोहळा पार पडला. त्यात अभिनेता ‘आस्ताद काळे’ याने उपविजेते पद पटकावलं होतं. अभिनेता असण्याबरोबर त्याने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं या कार्यक्रमामुळेच समोर होते. 

आपल्या अभिनयाने आस्तादने रसिकांची मनं जिंकली आहेत.आस्ताद सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. याच माध्यमातून तो आपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ तो शेअर करत असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट  शेअर केली आहे. सध्या याच पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने ''मी सध्या काम (अभिनय/सूत्रसंचालन) शोधतो आहे.माझ्या योग्य भूमिका असल्यास कृपया विचार करावा🙏🏻'' असे लिहीले आहे.''

https://www.facebook.com/aastadsunitapramod.kale/posts/3407490262706230

अस्ताद काळेने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचे 'तिला काही सांगायचंय' हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजले होते. या नाटकात तेजश्री प्रधान त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. अस्ताद मालिकांसोबतच रिएलिटी शोमध्येही झळकला होता. 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमात तो स्पर्धक म्हणून सहभागीह झाला होता.

या कार्यक्रमातील शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये तो होता. या कार्यक्रमामुळे तर त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. याआधी त्याने 'सरस्वती' या मालिकेत 'राघव' ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील त्याची आणि सरस्वतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. अस्ताद गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने 'अग्निहोत्र', 'पुढचे पाऊल' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: Actor Astad kale Searching For Work In Industry Share Post On Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.