आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 08:29 PM2024-04-30T20:29:01+5:302024-04-30T20:29:40+5:30

महाराष्ट्रातील सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा घेतला समाचार

When we say United India Congress prince Rahul Gandhi get feverish slams Prime Minister Narendra Modi | आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

PM Modi in Maharashtra, Lok Sabha Election 2024: लोकशाही उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा सध्या हंगाम सुरु आहे. दररोज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेला संबोधित करताना, काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. भाजपाचे लोक 'एक भारत' म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या शाहजाद्यांना ताप भरतो, असे ते म्हणाले.

"आम्ही आत्मनिर्भर भारताचा संकल्प जाहीर करतो, ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या शाहजाद्यांना ताप भरतो. आमचे सरकार सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी रात्रंदिवस काम करत असताना इंडीया आघाडीचे नेते मात्र मला शिव्याशाप देत जनतेच्या मनात संभ्रम पसरविण्याचे काम करत आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून खोटा प्रचारही सुरू केला असून मोदी सत्तेवर आल्यास संविधान बदलणार अशा अफवा पसरवून जनतेला घाबरविले जात आहे. पण असे काहीही होणार नाही," असे मोदी म्हणाले.

"दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधरा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले, त्याचा हिशेब करून त्याची शिक्षा त्या नेत्याला देण्याची वेळ आली आहे. जनतेच्या सेवेसाठी नव्हे, तर देशाला लुबाडून सत्तेची मलई चाखण्यासाठी आळीपाळीने पंतप्रधानपदावर बसण्याच्या व देशाचे विभाजन करण्याच्या काँग्रेस-इंडी आघाडीच्या प्रयोगास साथ देऊ नका," असे आवाहनही मोदी यांनी केले.

Web Title: When we say United India Congress prince Rahul Gandhi get feverish slams Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.