“१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 18:15 IST2024-04-19T18:09:54+5:302024-04-19T18:15:03+5:30
Congress Nana Patole: विदर्भातील पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

“१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा
Congress Nana Patole: मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहे. जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवले. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवले, शेतमालाला दीडपट भाव देणार, उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवले, कामगारांना देशोधडीला लावले, महिलांना फसवले, त्यामुळे जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिसे भरले याला विकास म्हणतात का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान पार पडले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची हुकुमशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे, त्यामुळे भाजपाचा दारुण पराभव होणार हे अटळ आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला.