अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाही; काँग्रेसनं डॉ. अभय पाटलांना रिंगणात उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:13 PM2024-04-01T22:13:40+5:302024-04-01T22:14:48+5:30

अभय पाटील यांचा सामना प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याविरोधात असेल.

Akola Lok Sabha: Congress candidate from Akola announced | अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाही; काँग्रेसनं डॉ. अभय पाटलांना रिंगणात उतरवलं

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा नाही; काँग्रेसनं डॉ. अभय पाटलांना रिंगणात उतरवलं

Akola Lok Sabha Congress List: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) काँग्रेस(Congress) पक्षाने आपल्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीतून महाराष्ट्रातील अकोला मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, काँग्रेसने अकोल्यातून डॉ. अभय काशिनाथ पाटील (Abhay Kashinath Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आज अखेर पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला. दरम्यान, अकोल्यासोबतच काँग्रेसने तेलंगणातील वारंगल मतदारसंघातील उमेदवारदेखील जाहीर केला आहे. काँग्रेसने वारंगलमधून कादियाम काव्या (Kadiyam Kavya) यांना उमेदवारी दिली आहे.

अभय पाटील यांना कोणाचे आव्हान?

अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे(Anup Dhotre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर(Prkash Ambedkar) लढणार आहे. त्यामुळे आता डॉ. अभय पाटील यांचा सामना या दोन नेत्यांशी असेल.

Web Title: Akola Lok Sabha: Congress candidate from Akola announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.