Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 22:18 IST2024-11-20T22:15:17+5:302024-11-20T22:18:45+5:30

Maharashtra Exit Poll 2024 : 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे...

Ajit Dada's prediction came true Mahayuti's 'Triple Engine' will wins so many seats in Exit Poll | Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'

Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'

महाराष्ट्र विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर,  आता एक्झिट पोलही आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलचे आकडे महायुतीसाठी आनंदाच्या बातमीचे संकेत देत आहेत. यांपैकी मॅट्रीजच्या आकडेवारीनुसार, राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) यांचे 'ट्रिपल इंजिन' अथवा 'तिकडी' 170 जागा जिंकू शकते. महत्वाचे म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुती 175 जागांच्या जवळपास जागा जिंकेल, अशी भविष्यवाणी केली होती.

महायुतीच्या 'ट्रिपल इंजिन'ला किती जागा?
मॅट्रीजच्या Exit Poll नुसार, राज्यातील 288 जागांपैकी महायुती 150 ते 170 जागा मिळत आहेत. यांपैकी भाजपाला 89 ते 101, शिवसेने (एकनाथ शिंदे) 37 ते 45 आणि एनसीपी (अजित पवार) 17 ते 26 जागा जिंकू शकते. 

महाविकास आघाडीला किती जागा -
तर, महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळत आहेत. यात काँग्रेसला 39 ते 47, शिवसेना ठाकरे गटाला 21 ते 29 आणि एनसीपी (शरदचंद्र पवार) 35 ते 43 जिंकू शकतात. महत्वाचे म्हणजे 2019 मध्ये भाजपा आणि अखंड शिवसेना एकत्रित लढले होते. मात्र नंतर, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि एनसीपीसोबत जाऊन सरकार स्थापन केले होते.

अजित पवारांची भविष्यवाणी -
तत्पूर्वी, प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीला मिळणाऱ्या जागांसंदर्भात अंदाज व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्ही समोर ठेवले आहे. एवढेच नाही, तर त्यासाठी महायुतीमधील प्रत्येक घटकपक्ष प्रयत्नशील आहे. तशा पद्धतीने आमचे काम सुरू आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले होते. 

सर्व प्रमुख एक्झिट पोल एका क्लिकवर
https://www.lokmat.com/elections/maharashtra-assembly-election-2024/exit-poll/

याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द वीकला दिलेल्या मुलाखतीतही सत्ताधारी महायुती 175 जागांच्या जवळपास जागा जिंकू शकते, असा दावा केला होता. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे.

Web Title: Ajit Dada's prediction came true Mahayuti's 'Triple Engine' will wins so many seats in Exit Poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.