Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:48 IST2025-12-30T13:47:58+5:302025-12-30T13:48:10+5:30

अनेक उमेदवार गॅसवर; मतदार बुचकळ्यात

there is confusion regarding candidate selection in all parties In the Ichalkaranji Municipal Corporation elections | Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली

अतुल आंबी

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली, उद्धवसेना वगळता शिव-शाहू आघाडीचे पण जमले. परंतु, दोन्हीकडे उमेदवारी यादी जाहीर करण्याचा घोळात घोळ सुरूच आहे. आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असूनही अनेक ठिकाणचे उमेदवार बदलाबदलीचा खेळ रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. गत चार दिवसांत घडलेल्या घडामोडी आणि वारंवार उमेदवारांची नावे बदलली जात असल्याने त्या प्रभागातील मतदारही बुचकळ्यात पडले आहेत.

भाजपकडे सर्वाधिक मागणी झाल्याने नाराजीनाट्य व बंडखोरीचा प्रकार पुढे येऊ लागला. यादी जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणात गळती लागेल, या भीतीने पक्षश्रेष्ठींनी गोपनीय पद्धतीने कारभार सुरू केला आहे. ज्याठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत, त्यांना पक्षाचा अधिकृत बी फॉर्म देऊन उमेदवारी दाखल करण्यास सांगितले. तर, ज्याठिकाणी फेरबदलाचा खेळ सुरू आहे, त्यांना तात्पुरते पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. आयत्या वेळी घडणाऱ्या घडामोडींमुळे असे फेरबदल होत आहेत.

वाचा : अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते-पोलिसांत वादावादी, आज शेवटचा दिवशी झुंबड उडणार

या फेरबदलामुळे अनेक उमेदवारांना या प्रभागातून त्या प्रभागात अचानक अर्ज भरायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या प्रभागातील मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी नाव वेगळे होते, आता वेगळे आहे, असाही प्रकार सुरू आहे. ज्याठिकाणी एकमताने उमेदवारी निश्चित झाली आहे, त्याठिकाणी सर्व काही सुरळीत सुरू असून, त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे.

स्वाभिमानी पुन्हा आघाडीत

शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली आहे. काही दिवसांपूर्वी ते वंचित बहुजन आघाडीसोबत परिवर्तन आघाडीत सहभागी झाले होते. त्यांनी सोमवारी निर्णय बदलला. त्याचबरोबर आणखीन काही उमेदवार आघाडीकडे येण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत खलबत्ते सुरू होती. येणाऱ्या व्यक्तींची नावे बाहेर पडल्यास त्यांना रोखण्यासाठी समजूत काढण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे आघाडीकडून गोपनीय पद्धतीने सूत्रे हाताळली जात आहेत. आज, मंगळवारी अर्ज भरल्यानंतरच उमेदवारांची नावे आणि काही नावांचा गौप्यस्फोट होणार आहे.

वाचा : कोल्हापुरात महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा

मतदारांना गृहीत धरल्याच्या भावना

इचलकरंजीत भाजप, शिंदेसेना यांचे निश्चित झाले. त्यापाठोपाठ राष्टवादी अजित पवार गटाने दोन जागांवर तडजोड केली असली, तरी अन्य जागांवर ते मैत्रिपूर्णचा डाव मांडण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर शिव-शाहू आघाडी त्यांच्याकडे येणाऱ्यांना जागा करून उमेदवारी देण्याचे बेरजेचे गणित ते घालत आहेत, तर आघाडीतून बाहेर पडलेल्या उद्धवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचे नियोजन लावले आहे.

या सर्व राजकीय उलथापालथीच्या घडामोडीत उमेदवार इकडून तिकडे उड्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे मतदारांना गृहीत धरले आहे का, अशी तीव्र भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर समाजमाध्यमांवरही असे मेसेज व्हायरल होत आहेत.

Web Title : इचलकरंजी चुनाव 2026: सभी पार्टियों में उम्मीदवार भ्रम; स्वाभिमानी की वापसी

Web Summary : इचलकरंजी नगर पालिका चुनाव में उम्मीदवार चयन को लेकर अफरा-तफरी मची है। शिव-शाहू गठबंधन ने स्वाभिमानी का स्वागत किया, जिससे चुनाव पूर्व नाटक और मतदाताओं की अनिश्चितता बढ़ गई है।

Web Title : Ichalkaranji Election 2026: Candidate Confusion Amidst All Parties; Swabhimani Returns

Web Summary : Ichalkaranji's municipal election sees candidate chaos as parties scramble for nominations. Shiv-Shahu alliance welcomes back Swabhimani, adding to the pre-election drama and voter uncertainty.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.