Kolhapur Municipal Election 2026: याद्या जाहीर झाल्या, अनेकांनी कोलांटउड्या घेतल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:29 IST2025-12-30T19:26:15+5:302025-12-30T19:29:31+5:30
दोन्ही आघाड्यांची दमछाक : सकाळपर्यंत भाजपच्या इच्छुक, दुपारी काँग्रेसच्या उमेदवार

Kolhapur Municipal Election 2026: याद्या जाहीर झाल्या, अनेकांनी कोलांटउड्या घेतल्या
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षीय उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी ज्या पक्षाची उमेदवारी मिळेल ती स्वीकारून मैदानात उडी घेतली. आपल्यातील नाराज अन्य पक्षांकडे जाऊ नये, यासाठी याद्या दाबून ठेवल्या खऱ्या; परंतु ज्यांना लढायचेच होते त्यांनी मिळेल तो झेंडा हातात घेऊन शड्डू ठोकलाच.
सकाळपर्यंत भाजपचे उमेदवार असलेले दुपारनंतर काँग्रेसच्या यादीत झळकले. जिथे भाजपची उमेदवारी मिळाली नाही त्यातील बरेच जनसुराज्य पक्षाच्या सावलीला गेले. सर्व वीस प्रभागांत उमेदवारी देताना महायुतीसह महाविकास आघाडीचीही दमछाक झाली. महायुतीकडे जास्त इनकमिंग असल्याने त्यांना नाराजीला जास्त सामोरे जावे लागले.
महायुतीत भाजपने ३६, शिंदेसेना ३० आणि राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत काँग्रेसने एकट्यानेच ७६ उमेदवार दिले. त्यांच्या आघाडीतील उद्धवसेनेला सहा जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने वंचित व ‘आप’शी आघाडी करून काही अपक्षांना आपल्या कवेत घेतले.
आपण कोणत्या विचारधारेचे आहे, मागील काही वर्षे घरोघरी कोणत्या पक्षाचे चिन्ह पोहोचवण्यासाठी राबलो, लोकसभेला-विधानसभेला कुणासाठी प्रचार केला, हे सगळे फाट्यावर मारून नेते जसे कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलू लागले आहेत तोच कित्ता कार्यकर्त्यांनीही गिरवल्याचे या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आले.
महायुतीने गेल्या काही दिवसांपासून अन्य पक्षातून इनकमिंग जोरात करून ठेवले होते. स्वबळावर लढण्याच्या हाका दिल्या होत्या. त्यावेळी किमान ८१ उमेदवार हवे म्हणून जो मिळेल त्याच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून त्याला पक्षात घेतले होते.
युती झाल्यावर तिन्ही पक्षांच्या जागा एकदम ४० टक्क्यांवर आल्या. त्यातील प्रत्येक नेत्यात आपापला कार्यकर्ता यादीत घुसवण्यासाठी रस्सीखेच लागली. परिणामी अर्ज भरून झाल्यावरच महायुतीची यादी जाहीर झाली. आपल्यातील नाराज अन्य पक्षांकडे जाऊ नये, यासाठी याद्या दाबून ठेवल्या खऱ्या; परंतु ज्यांना लढायचेच होते त्यांनी मिळेल तो झेंडा हातात घेऊन शड्डू ठोकलाच.
शिंदेसेनेच्या ३० उमेदवारांची यादी




काँग्रेसची शेवटची तिसरी १३ उमेदवारांची यादी
