मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:18 PM2024-04-10T12:18:13+5:302024-04-10T12:19:13+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती दिनांक १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार ...

Sanjay Mandlik, Darhysheel Mane will fill the application on Monday and Shahu Chhatrapati on Tuesday | मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती दिनांक १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे.

अर्ज भरण्यासाठीची रॅली ऐतिहासिक दसरा चौकातून निघणार असून, यावेळी इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे बहुतांशी नेते उपस्थित राहणार आहेत. शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, संजय राऊत हे विविध ठिकाणी सभा घेणार आहेत.

मंडलिक- माने सोमवारी भरणार अर्ज

महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज सोमवार, दि. १५ एप्रिल दाखल करण्यात येणार आहेत. या दोघांचाही अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महायुतीने सुरू केली आहे. महायुतीचे जिल्ह्यातील सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार असून तसे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित राहणार असून पुण्याहून मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील अर्ज दाखल करताना येणार आहेत.

Web Title: Sanjay Mandlik, Darhysheel Mane will fill the application on Monday and Shahu Chhatrapati on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.