twitterati get emotional as nobita finally marries shizuka in stand by me doraemon 2 | अखेर नोबिता व शिजूकाचे लग्न होणार! बातमी ऐकून इमोशनल झाले फॅन्स, ट्विटरवर टॉप ट्रेंड

अखेर नोबिता व शिजूकाचे लग्न होणार! बातमी ऐकून इमोशनल झाले फॅन्स, ट्विटरवर टॉप ट्रेंड

ठळक मुद्दे नोव्हेंबर 2020 मध्ये ‘स्टँड बाय मी डोरेमॉन 2’जपानमध्ये रिलीज झाला होता. फेबु्रपारी 2021 मध्ये हा सिनेमा इंडोनेशियात रिलीज होणार आहे. 

तुम्हीही बच्चेकंपनीसोबत कार्टून एन्जॉय करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोरेमॉनचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. डोरेमॉन हा भारतातील सर्वात लोकप्रिय कार्टून शो आहे. हा डोरेमॉन बच्चेकंपनीला जितका आवडतो, तितकाच त्याचा मित्र नोबिता हाही चिमुकल्यांचा आवडता आहे. हा नोबिता कोणासाठी वेडा आहे, तर तर तुम्हाला ठाऊक असेलच. नोबिता सतत शिजूकाच्या मागेपुढे करतो. तिला इम्प्रेस करण्याची एकही संधी तो सोडत नाही. तर आता याच शिजूका व नोबिताचे लग्न होणार आहे. आहे ना मजेदार?

होय, डोरेमॉनचा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय आणि यात शिजूका व नोबिताचे लग्न दाखवले जाणार आहे. या सिनेमाचे नाव ‘स्टँड बाय मी डोरेमॉन 2’ असे आहे. 2014 साली या सिनेमाचा पहिला पार्ट रिलीज झाला होता.

पहिल्या पार्टमध्ये डोरेमॉन व नोबिताची पहिली भेट आणि त्यांच्या अ‍ॅडव्हेंवरबद्दल दाखवण्यात आले होते. आता दुस-या भागात नोबिता व त्याची बालमैत्रिण शिजूकाच्या लग्नावर आधारित आहेत.
 नोव्हेंबर 2020 मध्ये ‘स्टँड बाय मी डोरेमॉन 2’जपानमध्ये रिलीज झाला होता. फेबु्रपारी 2021 मध्ये हा सिनेमा इंडोनेशियात रिलीज होणार आहे. 

ट्विटरवर होतेय ट्रेंड
नोबिता व शिजूकाचे लग्न होणार म्हटल्यावर ट्विटरवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. नोबिता व शिजूकाचे लग्न टिष्ट्वटरवर नंबर 1 ला ट्रेंड करतोय.

या कार्टून शोवर प्रेम करणा-या अनेकांनी आपआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हा सिनेमा रिलीज होईल आणि मी नोबिता व शिजूकाचे लग्न बघेन तेव्हा नक्कीच माझ्या डोळ्यांत अश्रू असतील,’ असे एका युजरने लिहिले.

अन्य एका युजरने लिहिले, ‘प्लीज, प्लीज, मी नोबितासाठी रडणार आहे.’  काहींनी यावर मजेदार कमेंट्सही दिल्यात. ‘2021 मध्ये नोबिता व शिजूकाचे लग्न होणार आहे, आत्ता तरी 2021 आपल्यासाठी वाईट नव्हते हे मान्य करा,’ असे या युजरने लिहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: twitterati get emotional as nobita finally marries shizuka in stand by me doraemon 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.