(Image Credit : www.in.com)

हॉलिवूडमधील बरेच अभिनेते भारतात लोकप्रिय आहेत. त्यातील एक म्हणजे मिस्टर बिन म्हणून लोकप्रिय असलेले Rowan Atkinson. त्यांना बघताच चेहऱ्यावर एक हसू येतं. त्यांच्या भूमिका असलेले सिनेमे लोक स्ट्रेस बस्टर म्हणून बघतात. नव्वदच्या दशकात मिस्टर बीन नावाचा शो होता. त्यातून त्यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं. त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली. आज या मिस्टर बीनबाबत आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मिस्टर बीन राजा राजांसारखे जीवन जगतात. तर जाणून घेऊयात कशी आहे त्यांची लाइफस्टाईल.

मिस्टर बीन हा शो सलग पाच वर्ष चालला आणि लोकप्रियतेच्या उंच शिखरावर पोहोचला. टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेल्या शोंपैकी हा एक शो ठरला. Rowan Atkinson यांना या शोमधून लोकप्रियता तर मिळालीच सोबतच भरपूर पैसाही मिळाला. मिस्टर बीन हीच Rowan Atkinson यांची ओळख झाली. त्यानंतरही अनेक शोमध्ये ते दिसले. 

Rowan Atkinson यांचा जन्म अमेरिकेतील डरहम मधील. त्यांचे वडील शेतकरी होते. तरूण वयात ते शेतात ट्रॅक्टर चालवायचे. पण त्यांची स्वप्ने वेगळीच होती. त्यांना लक्झरी कारची फार आवड. जगातील सर्वात महागडी कार घेण्याचं त्यांचं स्वप्न होतं. रोवन हे आज ६४ वर्षांचे असून त्यांना तीन मुले आहेत. रोवन यांच्या अभिनयाकरिता ब्रिटिनच्या महाराणीने त्यांचा विशेष गौरव केला होता. 

मिस्टर बीन हे आठ हजार करोड संपत्तीचे मालक असून त्यांचं नाव ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जातं. त्यांचं स्टारडम हे हॉलिवूडमधील मोठ्या ॲक्टर पेक्षाही जास्त आहे. लंडनमध्ये त्यांचा आलिशान महाल असून याची किंमत अब्जो रूपये आहे. 

रोवन यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या कार्सचं कलेक्शन आहे. रोल्स रॉयस, एस्टोन मार्टिन डीबी2, बीएमडब्लू 328, आणि एक्यूरा, एनएसएक्स अशा कार त्यांच्याकडे आहेत. मैकलोरेन एफ १ ही सर्वात महागडी कार असून याची किंमत अंदाजे ८० ते १०० कोटी इतकी आहे.

Web Title: Rowan Atkinson Luxury Lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.