Popstar Rihanna Poses Topless For Her Lingerie Brand With Ganesha Necklace | रिहानाच्या या कृत्याचं समर्थन कराल का? टॉपलेस होऊन....

रिहानाच्या या कृत्याचं समर्थन कराल का? टॉपलेस होऊन....

भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानाने ट्वीट  केल्यानंतर तिच्या ट्वीटने अख्खा देश ढवळून निघाला होता. आपण यावर बोलत का नाही? असा सवाल करत रिहानानेशेतकरी आंदोलनाला पाठींबा देताच, भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. रिहानाच्या या ट्वीटवर भारतात वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया दिल्या होत्या. शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणा-या रिहानाचे काहींनी भरभरून कौतुक केले तर काहींनी आमच्या अंतर्गत मुद्यांत नाक खुपसू नको, अशा शब्दांत रिहानाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला होता.

पॉप सिंगर रिहाना तिची गाणी आणि फॅशन सेन्समुळे जास्त चर्चेत असते. रिहाना केवळ एक गायिका नाही तर यशस्वी बिझनेसवुमनही आहे. २०१७ मध्ये तिनं आपला फॅशन आणि कॉस्मॅटिक्सचा फेंटी हा ब्रॅन्ड सुरू केला आहे. रिहाना कायमच सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते.आता पुन्हा एकदा रिहानाने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी कोणत्या मुद्यावर तिने आपले मंत मांडले नाहीय. तर तिच्या टॉपलेस फोटोमुळे ती चर्चेत आहे. 


रिहानाने लॉन्जरी  ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस पोज देताना दिसत आहे. इथरच रिहाना थांबली नाही तर तिने गळ्यात गणपतीचे पेडेंट घातल्याचे पाहायला मिळत आहे. टॉपलेस फोटोमध्ये अशा प्रकारे गणपतीचे पेडंट परिधान केल्याचे पाहून सोशल मीडियावर रिहानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सोशल मीडियावर रिहानावर प्रचंड टीका होत आहे.

रिहाना वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही. यापूर्वीही तिने अशा प्रकारे स्टंट करत वादात अडकली होती.  २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या रिहानाच्या कार्यक्रमाममधील गाण्यात वापरण्यात आलेल्या ओळींमुळे रिहानाने इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या. प्रचंड टीकेचा सामना केल्यानंतर रिहानाने जाहीर माफीही मागावी लागली होती. इतकेच नाहीतर २०१३ साली एका आबुधाबीमधील मशीदीच्या परिसरात रिहाना विचित्र पोजमध्ये फोटो काढताना आढळून आली होती. तेव्हा मशीदीमधून  रिहानाला बाहेर काढण्यात आलंं होते. तसेच तिच्या गाण्यांच्या व्हिडीओ अल्बमुळेही वाद निर्माण होतच असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Popstar Rihanna Poses Topless For Her Lingerie Brand With Ganesha Necklace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.