ठळक मुद्देकेवळ चारच दिवसांत एरिका कोइक आणि निकोलस केज यांनी घटस्फोट घेण्याचे का ठरवले याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पण एरिका कोइक आणि निकोलस केज या दोघांनाही याबद्दल मीडियात काहीही न बोलणेच पसंत केले आहे.

हॉलिवूड अभिनेता निकोलस केज त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या नात्यांमुळे जास्त चर्चेत असतो. त्याने नुकतेच चौथे लग्न केले होते. पण त्याचे हे लग्न देखील धोक्यात असल्याची चर्चा आहे. 

निकोलस केजने काही दिवसांपूर्वी मेकअप आर्टिस्ट एरिका कोइक सोबत लग्न केले होते. पण आता लग्न झाल्यानंतर काहीच दिवसांत एक वेगळी चर्चा रंगली आहे. लग्न झाल्यानंतर काहीच दिवसानंतर त्या दोघांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या असून त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले वृत्त न्यूज डेली मेलने दिले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण लग्न झाल्यानंतर केवळ चार दिवसांत त्या दोघांनी एकमेकांसोबत घटस्फोट घ्यायचे ठरवले असल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

निकोलस केज आणि एरिका कोइक वेगळे होणार हे त्यांच्या फॅन्सना कळल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या आवडत्या निकोलसला प्रश्न विचारत आहेत. त्या दोघांमध्ये काय झाले की, इतक्या कमी दिवसांत त्यांनी हा निर्णय घेतला याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. केवळ चारच दिवसांत एरिका कोइक आणि निकोलस केज यांनी घटस्फोट घेण्याचे का ठरवले याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पण एरिका कोइक आणि निकोलस केज या दोघांनाही याबद्दल मीडियात काहीही न बोलणेच पसंत केले आहे. मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार त्या दोघांनी शनिवारी मॅरेज सर्टिफिकेटसाठी अर्ज दाखल केला होता आणि त्यांना त्याच दिवशी मेडिकल सर्टिफिकेट देखील मिळाले होते. पण आता ५५ वर्षीय निकोलसने बुधवारी लग्न रद्द करण्यासाठी कोर्टात अपील केली आहे. 

एरिका कोइक आणि निकोलस केज यांनी लग्नाच्या आधी देखील त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत मीडियासमोर काहीही न बोलणेच पसंत केले होते. आता देखील त्यांच्याकडून काहीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. 

निकोलस केजची आजवर तीन लग्न झाली आहेत. १९९५ मध्ये अभिनेत्री पेट्रीसियासोबत त्याने लग्न केले होते. पण २००१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २००२ मध्ये लीजा मारीसोबत तो विवाहबंधनात अडकला. पण लग्नानंतर दोनच वर्षांत ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर त्याने एलिस किनसोबत लग्न केले. १२ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. 


Web Title: Nicolas Cage Files for Annulment Just 4 Days After Marrying Girlfriend Erika Koike in Las Vegas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.