ठळक मुद्दे किमचा हा ड्रेस बनवायला जवळजवळ आठ महिने इतका कालावधी लागला. किमचा हा ड्रेस पाहून ती सुमुद्रातून भिजून भेट इथे आली असल्याचे वाटत आहे असे तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटद्वारे सांगितले आहे. 

मेट गाला 2019’मध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. मेट गालाच्या पिंक कार्पेटवर सेलिब्रेटींचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. या सेलिब्रेटींमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ती किम कार्दशियनची. किमच्या बोल्ड लुकवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

किम ही हॉलिवूडमध्ये स्टायलिश अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील ती तिचे हॉट आणि सेक्सी फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर देखील चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. 

किम कार्दशियनने यंदाच्या मेट गाला मध्ये सेक्सी ड्रेस घातला होता. यात तिची फिगर खूपच छान दिसत असून तिच्या या किलिंग अंदाजाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या ड्रेससोबत जास्त ज्वेलरी न घालता एकदम सिम्पल राहाणे तिने पसंत केले होते. किमने घातलेल्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. किमचा हा ड्रेस बनवायला जवळजवळ आठ महिने इतका कालावधी लागला. किमचा हा ड्रेस पाहून ती सुमुद्रातून भिजून भेट इथे आली असल्याचे वाटत आहे असे तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटद्वारे सांगितले आहे. 

किमसोबत मेट गाला मध्ये कान्ये वेस्टला देखील पाहाण्यात आले. त्या दोघांनी एकत्रच एंट्री घेतली. कान्येने काळ्या रंगाची ट्राऊजर, काळ्या रंगाची झिपर आणि त्याच रंगाचे शूज घातले होते. किम आणि कान्ये यांनी एंट्री करताच सगळ्यांचे लक्ष किमकडे गेले. किमने मेट गालाच्या पिंक कारर्पेटला चार चाँद लावले अशीच सगळीकडे चर्चा रंगली होती.

किमने रॅपर आणि फॅशन डिझायनर कान्ये वेस्टसोबत 2014 मध्ये लग्न केले. याआधी किमची दोन लग्नं झाली होती. किम नेहमीच तिच्या वक्तव्यांसाठी चर्चेत असते. 

किम प्रमाणेच प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, निक जोनास, सोफी टर्नर जोनास, केली आणि केल्डल जेनर, सेरेना विलियम्स यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी मेट गाला 2019 मध्ये हजेरी लावली आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटने लोकांची मने जिंकली. 


Web Title: Met Gala 2019: Kim Kardashian West opts for a ‘wet and dripping’ look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.