marvel studios announces 11 upcoming movies after avengers endgame | पिक्चर अभी बाकी है दोस्त! मार्वेल स्टुडिओने एकाचवेळी केली ११ प्रोजेक्टची घोषणा!!
पिक्चर अभी बाकी है दोस्त! मार्वेल स्टुडिओने एकाचवेळी केली ११ प्रोजेक्टची घोषणा!!

अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’ या चित्रपटाने ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिज संपली आणि चाहते हळहळले. मार्वेल स्टुडिओच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिजने अनेकांना अक्षरश: वेड लावले होते. पण ही सीरिज संपली म्हटल्यावर अनेकांना  रडू कोसळले. पण पिक्चर अभी बाकी है दोस्त! होय, ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिज संपली असली तरी मार्वेल स्टुडिओचे सिनेमे आणि सीरिज मात्र संपलेल्या नाहीत. होय, कारण मार्वेलने एकाचवेळी एक नाही, दोन नाही तर तब्बल 11 सिनेमा व ओरिजनल सीरिजची घोषणा केली आहे. होय, मार्वेल स्टुडिओच्या चौथ्या टप्प्यात थॉर 4, डॉक्टर स्ट्रेंज 2, द फॅल्कन अ‍ॅण्ड द विंटर सोल्जरसह अनेक चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हे सर्व सिनेम 2020 आणि 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. चाहते ही बातमी ऐकून इतके खूश आहेत की, सोशल मीडियावर  हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
तेव्हा मार्वेलचे हे 11 सिनेमे कुठले यावर एक नजर टाकुयात...

ब्लॅक विडो 

ब्लॅक विडो या चित्रपटात स्कार्लेट जोहारसन दिसणार आहे. हा चित्रपट मे 2020 मध्ये प्रदर्शित होईल.

थॉर- लव अ‍ॅण्ड थंडर
या सिनेमात क्रिस हेमस्वॉर्थ, टेसा थॉम्पसन आणि नेटली पोर्टमेन मुख्य भूमिकेत असणार. 5 नोव्हेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हॉकआय 

‘हॉकआय’वर एक ओरिजनल वेबसीरिजही मार्वेल घेऊन येतोय. यात जेरेमी रेनर पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

व्हॉट इफ
व्हॉट इफ हा जेफरी राईटसोबत एमसीयूची पहिली अ‍ॅनिमेटेड सीरिज असणार आहे.

डॉक्टर स्ट्रेंज 

मार्वेलने डॉक्टर स्ट्रेंजच्या सीक्वलचीही घोषणा केली आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिवर्स आॅफ मॅडनेस’ हा सीक्वल 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

लोकी 

मार्वेल लवकरच ‘लोकी’ ही ओरिजनल वेबसीरिजही बनवतोय. यात टॉम हिडलस्टन पुन्हा एकदा लोकीची भूमिका साकारताना दिसेल.

वांडाव्हिजनमार्वेलने ‘वांडाव्हिजन’ या ओरिजनल सीरिजचीही घोषणा केलीय. 

 


Web Title: marvel studios announces 11 upcoming movies after avengers endgame
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.