Met Gala 2021: सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ देतात माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 02:38 PM2021-09-15T14:38:09+5:302021-09-15T14:38:40+5:30

Met Gala 2021: Met Gala 2021 मध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ दिले असावेत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

keke palmer shares photo of sad met gala food | Met Gala 2021: सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ देतात माहितीये का?

Met Gala 2021: सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ देतात माहितीये का?

Next
ठळक मुद्देअमेरिकन अभिनेत्री Keke Palmer हीने तिच्या डिनरचा एक फोटो शेअर केला आहे

न्युयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये नुकताच Met Gala 2021 हा सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये हॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तसंच दरवर्षीप्रमाणे यावेळीदेखील काही सेलिब्रिटींनी त्यांच्या अतरंगी स्टाइलमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. यात किम कार्दशियन, जेनिफर लोपेझ, बेन एफ्लेक, टिमथी शैलेमे, डॅन लेवी हे कलाकार त्यांच्या आऊटफिटमुळे जास्त चर्चिले गेले. परंतु, आता सोशल मीडियावर एक नवीन चर्चा रंगली आहे.  Met Gala 2021 मध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ दिले असावेत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Met Gala 2021 चा सोहळा पार पडल्यानंतर अमेरिकन अभिनेत्री Keke Palmer हीने तिच्या डिनरचा एक फोटो शेअर केला होता. यावेळी तिच्या ताटात काही नवीन पदार्थ पाहायला मिळाले. तेव्हापासून मेट गालामध्ये सेलिब्रिटींनी नेमके कोणते पदार्थ सर्व्ह केले जातात हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली

Met Gala 2021 च्या डिनर मेन्यूमध्ये असतात 'हे' पदार्थ

या सोहळ्यामध्ये सेलिब्रिटींना शक्यतो डाएट पदार्थ दिले जातात. यात काकडीचे तुकडे, ब्रोकोली, मक्याचे दाणे, टोमॅटो असे पदार्थ दिले जातात. मेट गालामध्ये प्लांट बेस्ड अन्नच सेलिब्रिटींनी दिलं जातं. यात नॉनव्हेज पदार्थांचा जराही समावेश नसतो.

दरम्यान, Keke तिच्या डिनर प्लेटचा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या. ''हे काय विचित्र पदार्थ खाताय तुम्ही'', ''जर मी ३० हजार रुपये दिले असते आणि असे पदार्थ मिळाले असते तर मी रिफंड मागितला असता'', ''मी माझ्या आईला तुझ्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ करायला सांगतो'', अशा एकाहून एक असंख्य मजेदार कमेंट्स Keke च्या पोस्टवर आल्या आहेत.

Web Title: keke palmer shares photo of sad met gala food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app