Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:45 PM2021-09-14T19:45:00+5:302021-09-14T19:45:00+5:30

Met Gala 2021: न्युयॉर्कच्या मेटोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये यंदा मेट गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी किमने काळ्या रंगाचा एक विचित्र ड्रेस परिधान केला होता.

Met Gala 2021: "What's going on?" Kareena was shocked to see Kim Kardashian's look | Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली

Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली

Next
ठळक मुद्देहॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' किम कार्दशियन कायमच तिच्या अतरंगी स्टाइलसाठी चर्चेत येत असते.

हॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' किम कार्दशियन कायमच तिच्या अतरंगी स्टाइलसाठी चर्चेत येत असते. नुकतीच तिने मेट गाला २०२१मध्ये (Met Gala 2021) हजेरी लावली होती. यावेळीदेखील ती नेहमीप्रमाणे तिच्या अतरंगी स्टाइलमुळेच चर्चेत आली. विशेष म्हणजे तिने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेसची सर्व स्तरांमध्ये चर्चा होत असून अभिनेत्री करीना कपूर-खाननेदेखील त्यावर कमेंट केली आहे.

न्युयॉर्कच्या मेटोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये यंदा मेट गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी किमने काळ्या रंगाचा एक विचित्र ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तिने स्वत:ला डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्णपणे झाकून घेतलं होतं. तिचा हा ड्रेस पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. यात करीना कपूर-खाननेदेखील इन्स्टावर किमचा फोटो शेअर हे काय आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे.

करीनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये किमचा फोटो शेअर केला आहे. सोबतच "हे काय होतंय?" असा प्रश्न विचारला आहे. विशेष म्हणजे किमचा लूक पाहून करीनादेखील चक्रावली आहे.

किम कार्दशियन कायमच तिच्या चित्रविचित्र फॅशन, मादक व्हिडीओ, फोटो आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे मेट गालाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मात्र, यावेळीदेखील काही मोजक्या पाहुण्यांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मेट गाला म्हणजे नेमकं काय?

मेट गाला हा एक अॅन्युअल कॉस्ट्यूम फॅशन शो आहे. यात अनेक मोठ मोठे कलाकार अतरंगी ड्रेस परिधान करुन येतात. यंदाच्या मेट गाला रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी चित्रविचित्र अवतारात उपस्थितीत राहिले होते. मात्र, दरवेळेप्रमाणे हॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ किम कार्दशियनने उपस्थितांच्या नेजरा वेधून घेतल्या.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Met Gala 2021: "What's going on?" Kareena was shocked to see Kim Kardashian's look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app