...तरीही मी 'ब्रा' घालणार नाही; हेमांगीच्या 'बोल्ड' पोस्ट पाठोपाठ हॉलिवूड अभिनेत्रीनं थेट जाहीरच केलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 03:12 PM2021-07-14T15:12:24+5:302021-07-14T15:22:49+5:30

मी ब्रा घालणार नाही,’असं तिनं निक्षून सांगितलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

I don’t care if my breasts reach my belly button - Gillian Anderson | ...तरीही मी 'ब्रा' घालणार नाही; हेमांगीच्या 'बोल्ड' पोस्ट पाठोपाठ हॉलिवूड अभिनेत्रीनं थेट जाहीरच केलं!

...तरीही मी 'ब्रा' घालणार नाही; हेमांगीच्या 'बोल्ड' पोस्ट पाठोपाठ हॉलिवूड अभिनेत्रीनं थेट जाहीरच केलं!

Next
ठळक मुद्देसाहजिकच गिलियनच्या या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोस. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करणा-या बहुतांश महिला आहेत.

मराठमोठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही बेधडक पोस्ट तुम्ही वाचली असेलच. ब्रा वापरायची की नाही, हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो, असं तिनं ट्रोल करणा-यांना सुनावलं. हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि आता काय तर एका हॉलिवूड अभिनेत्रीनंही आयुष्यात यापुढं कधीही ब्रा घालणार नसल्याचं थेट सोशल मीडियावर जाहिर करून टाकलं. चक्क तिनं याचा व्हिडीओच शेअर केला. ‘माझे स्तन माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील. पण मी ब्रा घालणार नाही’, असं तिनं स्पष्टपणं सांगून टाकलं. (Gillian Anderson Reveals She’s Done With Wearing A Bra)

या हॉलिवूड अभिनेत्रीचं नाव आहे गिलियन अँडरसन (Gillian Anderson). नुकत्याच तिनं सोशल मीडियावर चाहत्यांशी गप्पा मारल्या आणि या गप्पा गिलियनच्या ब्रा न वापरण्याच्या निर्णयापर्यंत आल्या.
‘ मी खूप आळशी आहे आणि यापुढे मी ब्रा घालणार नाही. माझे स्तन माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील. पण मी ब्रा घालणार नाही,’असं तिनं निक्षूनच सांगितलं.   तिचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

साहजिकच गिलियनच्या या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोस. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करणा-या बहुतांश महिला आहेत. तिच्या या निर्णयाला अनेकींनी पाठींबा दिला आहे.
 गिलियन अँडरसन ही ब्रिटीश-अमेरिकन अभिनेत्री आहे. नाटकांपासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणा-या गिलियनला ‘द एक्स फाईल्स’ या अमेरिकन शोमध्ये वेगळी ओळख दिली. द हाउस आॅफ मिर्थ, द माइटी सेल्ट,  द लास्ट किंग आॅफ स्कॉटलँड,  द एक्स फाइल्स  आणि  द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह  अशा अनेक हॉलिवूडपटात तिने काम केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I don’t care if my breasts reach my belly button - Gillian Anderson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app