हॉलिवूडचा हार्ट थ्रॉब रॉबर्ट डाउनी जुनियर भारतीय फिल्म प्रेक्षकांनाही खूप आवडतो, हे नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवरून सिध्द झालंय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणानूसार, ‘आर्यन मॅन' रॉबर्ट डाउनी जूनियर भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार रॉबर्ट डाउनी जुनियरच्यानंतर विल्स स्मिथ भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. डिजिटल (सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंट ह्या सर्वांमध्ये रॉबर्ट डाउनी अग्रेसर असून 100 गुणांसह त्यांनी लोकप्रियतेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.  

तर, ‘अलादीन’ चित्रपट फेम जिन म्हणजेच अभिनेता विल स्मिथने 90 गुणांसह लोकप्रियतेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ई पेपर (न्यूज़प्रिंट) आणि वायरल न्यूज श्रेणीमध्ये विल स्मिथच्या असलेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर विल स्मिथ दूस-या स्थानावर आहे. फिल्म ‘अवेंजर्स’चा थॉर म्हणजेच अभिनेता क्रिस हेम्सवर्थ हॉलीवूड अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत तिस-या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेला अभिनेता क्रिस हेम्सवर्थचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे 73 गुणांसह क्रिस हेम्सवर्थ स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर तिस-या स्थानावर पोहोचला आहे.

 


आपल्या सुपरहिरो भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता क्रिस्टोफर इवांस ह्या लोकप्रियतेच्या यादीत चौथ्या पदावर आहे. डिजिटल (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट) श्रेणीमध्ये क्रिस्टोफरच्या फॅनफॉलोविंगमूळे त्याच्याविषयी भरपूर कवरेज दिसून आलंय. ह्या 'कॅप्टन अमेरिका'ने 58 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. तर, अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओचा गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात एक चाहतावर्ग आहे. हे फॅन्स लिओनार्डोच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतात. त्यामूळे लिओनार्डोच्या फॅनफॉलोविंगमध्ये एक सातत्य दिसून आले आहे. 45 गुणांसह लिओनार्डो डिकॅप्रिओ स्कोर ट्रेंड्स चार्टवर पाचव्या रँकिंगवर आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी खुलासा करताना म्हणतात, "निस्संदेहपणे संपूर्ण भारतात अवेंजर्स हा सर्वाधिक पाहिला गेलेला हॉलिवूड चित्रपट आहे. आणि म्हणूनच ह्या चित्रपटाचे अभिनेते, रॉबर्ट डाउनी जूनियर, क्रिस हेम्सवर्थ आणि क्रिस्टोफर इवांस भारतीय लोकप्रियतेच्या यादीत अग्रेसर स्थानावर दिसून आले आहेत. "


अश्वनी कौल पुढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

 


Web Title: Hollywood actor robert downey jr famous in india
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.