Daniel Craig film No Time to Die new trailer released | VIDEO : धमाकेदार अ‍ॅक्शन असलेल्या 'नो टाइम टू डाय' चा ट्रेलर रिलीज, बघा जेम्स बॉन्डचं नवं मिशन!

VIDEO : धमाकेदार अ‍ॅक्शन असलेल्या 'नो टाइम टू डाय' चा ट्रेलर रिलीज, बघा जेम्स बॉन्डचं नवं मिशन!

अभिनेता डॅनिअल क्रेगच्या आगामी जेम्स बॉन्ड सीरीजमधील 'नो टाइम टू डाय' सिनेमाचा वा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधून अ‍ॅक्शन सीनचा फूल डोज देण्यात आलाय. यातील अ‍ॅक्शन सीन इतके धमाकेदार आहेत की, पाहून अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही. जेम्स बॉन्ड फ्रांयजचीतील हा २५वा सिनेमा आहे.

'नो टाइम टू डाय' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की जमैकामध्ये डॅनिअल क्रेग म्हणजे जेम्स बॉन्ड रिटायर होऊन निवांत जगत आहे. तेव्हा त्याचा एक जुना मित्र त्याला मदत मागण्यासाठी येतो. त्याच्या सांगण्यावरून जेम्स बॉन्ड एका किडनॅप करण्यात आलेल्या वैज्ञानिकाला सोडवण्याच्या मिशनवर निघतो. या मिशन दरम्यान जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत.

'नो टाइम टू डाय' हा सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे आता हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. डॅनिअल क्रेग लागोपाठ पाचव्यांदा जेम्स बॉन्डच्या भूमिकेत दिसत आहे. तर जेम्स बॉन्डचे फॅन आतुरतेने या सिनेमाची वाट बघत आहेत. 

'नो टाइम टू डाय'चं दिग्दर्शन जोजी फुकुनागा केलं आहे. दरम्यान, जेम्स बॉन्ड सीरीजचे जगभरात फॅन्स आहे. आजही या सिनेमांना मोठा प्रेक्षक बघतो. जेम्स बॉन्डचा पहिला सिनेमा १९६२ मध्ये आला होता. जेम्स बॉन्ड फ्रान्चायजीचे ५८ वर्षात २४ सिनेमे तयार करण्यात आले आहेत.

हे पण वाचा :

'द रॉक'च्या Black Adam या सुपर व्हिलन सिनेमाचा टीजर रिलीज, पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिकेत दिसणार

Death Of The Nile Trailer : अली फजलच्या वंडर वुमनसोबतच्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Daniel Craig film No Time to Die new trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.