Black Adam Teaser: Dwayne Johnson aka The Rock Hollywood movie official teaser release | 'द रॉक'च्या Black Adam या सुपर व्हिलन सिनेमाचा टीजर रिलीज, पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिकेत दिसणार

'द रॉक'च्या Black Adam या सुपर व्हिलन सिनेमाचा टीजर रिलीज, पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिकेत दिसणार

हॉलिवूडचा यावर्षी सर्वात जास्त कमाई करणारा सुपरस्टार डे्वन जॉनसन ज्याला आपण द रॉकच्या नावाने ओळखतो त्याचा आगामी 'ब्लॅक अ‍ॅडम' सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. ड्वेनच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बाब आहे. ड्वेन या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खास बाब ही आहे की, ड्वेनची या सिनेमातील भूमिका थोडी निगेटीव्ह शेडची आहे. याची झलक या टीजरमध्ये बघायला मिळते. सोबतच या सिनेमातील त्याच्या लूकचीही चर्चा जोरदार सुरू आहे.

Black Adam या सिनेमाच्या टीजरमध्ये दाखवण्यात आले आहे की, कशाप्रकारे डीसी कॉमिक्समधील काल्पनिक देश खानडकमध्ये 'ब्लॅक अ‍ॅडम' हे नाव एका गुलाम व्यक्तीसाठी ठेवलं जातं. त्याला नंतर सुपर पॉवर मिळते. पण अशात त्याच्यात काही नकारात्मक शक्ती जन्म घेतात. जॉनसन टीजरच्या व्हाइस ओव्हरमध्ये म्हणताना ऐकायला येतं की, खानडकला एका हिरोची गरज होती. पण त्यांना मी मिळालो.

या सिनेमातील जॉनसनच्या कॅरेक्टर ब्लॅक डमअ‍ॅबाबतच्या इतिहासाबाबत सांगायचं तर तो आपल्या शक्तींचा चुकीचा वापर करतो. त्यानंतर त्याला बंदी बनवण्यात येतं. पण ५ हजार वर्षानी तो सुटून पुन्हा परत येतो आणि आता त्याला साऱ्या जगावर राज्य करायचं आहे. 

Black Adam सिनेमाचं दिग्दर्शन जाउमे कोलेट सेराने केलं आहे. तर सिनेमाची निर्मिती ड्वेन जॉनसन याने स्वत: केली आहे. हा सिनेमा २२ डिसेंबर २०२१ ला रिलीज केला जाणार आहे. ड्वेन जॉनसन म्हणजेच द रॉकचे फॅन्स जगभरात आहेत. कोरोना काळात मनोरंजन विश्वातून फार कमी चांगल्या बातम्या मिळत आहेत. अशात ड्वेनच्या या नव्या भूमिकेने फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद येऊ शकतो. पण यासाठी त्यांना पुढच्या डिसेंबरची वाट बघावी लागेल.

Death Of The Nile Trailer : अली फजलच्या वंडर वुमनसोबतच्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Black Adam Teaser: Dwayne Johnson aka The Rock Hollywood movie official teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.