Avatar 2 teaser : बहुप्रतिक्षीत ‘अवतार 2’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित; रिलीज डेटही आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:26 AM2022-05-10T10:26:55+5:302022-05-10T11:14:11+5:30

Avatar 2: प्रदर्शित झालेल्या टीझर ट्रेलरसह या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना या चित्रपट लवकरच पाहाता येणार आहे.

avatar 2 the way of water trailer released online james cameron | Avatar 2 teaser : बहुप्रतिक्षीत ‘अवतार 2’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित; रिलीज डेटही आली समोर

Avatar 2 teaser : बहुप्रतिक्षीत ‘अवतार 2’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित; रिलीज डेटही आली समोर

Next

जेम्स कॅमरुन (James Cameron) यांच्या ‘अवतार 2’ (Avatar 2) या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक  महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. हा पहिला पार्ट तुफान लोकप्रिय झाला होता. त्यामुळे दुसरा पार्ट पाहण्यासाठीही प्रेक्षक कमालीचे उत्सुक होते. यामध्येच आता प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता या चित्रपटाचा धमाकेदार टीझर ट्रेलर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच सोशल मीडियावर ट्रेंड झाला.

प्रदर्शित झालेल्या टीझर ट्रेलरसह या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना या चित्रपट लवकरच पाहाता येणार आहे. ‘अवतार’च्या (Avatar) या सिक्वलचं नाव ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way of Water trailer) असं असून हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये?

प्रदर्शित झालेला ट्रेलर हा १ मिनिट ३८ सेकंदांचा आहे. हा ट्रेलर अवतारच्या अधिकृत पेजवर शेअर करण्यात आला असून त्याला ट्रेलर टीझर असं म्हटलं आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटाविषयी फारसा खुलासा करण्यात आला नाही. मात्र, त्यात दाखवण्यात आलेल्या काही अद्भूत गोष्टींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


‘अवतार 2’ मध्ये व्हिज्युअल इफेक्टसचा भरणा

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये समुद्रातील निळंशार पाणी दाखवण्यात आलं आहे. आम्ही जिथे कुठेही जातो, हे कुटुंबच आमचा किल्ला होऊन जातं, असं जेक या ट्रेलरमध्ये म्हणतांना दिसत आहे.

सर्वाधिक कमाई करणारा अवतार

आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून अवतारकडे पाहिलं जातं. या चित्रपटात सॅम वर्थिंगटन,जो सलदाना, स्टिफन लँग, मिशेल रोड्रिग्ज या कलाकारांनी अवतारमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसंच ते आता सिक्वलमध्येही झळकणार आहेत. इतकंच नाही तर या सिक्वलमध्ये त्यांच्यासोबत केट विंसलेट आणि विन डिजलदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: avatar 2 the way of water trailer released online james cameron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app