केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील, काँग्रेसचा इशारा

By पूजा प्रभूगावकर | Published: May 2, 2024 01:38 PM2024-05-02T13:38:00+5:302024-05-02T13:39:51+5:30

Goa Lok Sabha Election 2024: केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल, यामुळे पक्षांतर करणारे आमदार थेट अपात्र ठरतील व १० ते १५ भाजपशासित (BJP) राज्य सरकारे कोसळतील, असे कॉंग्रेसचे (Congress) राष्ट्रीय मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Lok Sabha Election 2024: 15 BJP-ruled state governments will collapse as soon as the India Aghadi government comes to the Centre, warns Congress | केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील, काँग्रेसचा इशारा

केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील, काँग्रेसचा इशारा

- पूजा नाईक प्रभूगावकर

पणजी - केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल, यामुळे पक्षांतर करणारे आमदार थेट अपात्र ठरतील व १० ते १५ भाजपशासित राज्य सरकारे कोसळतील असे कॉंग्रेसचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गोव्यात कॉंग्रेसला मजबुत करावा. कॉंग्रेस मजबूत म्हणजे येथील प्रत्येक व्यक्ती मजबूत होतील. भाजपचे उमेदवार हे पंतप्रधान मोदी व त्यांच्या मित्रांसाठी काम करणार.आश्वासन पूर्ण न करणारे लोक गोमंतकीयांना नको आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खेरा म्हणाले, की कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांनी गोव्यावर संविधान थोपण्यात आले असे म्हटले नाही. त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला.पक्षांतर करणाऱ्यांची आता खैर नाही. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच १० वे परिशिष्ट मजबूत केले जाईल. यामुळे पक्षांतर करणारे अपात्र ठरतील. त्यामुळे त्यांना आता थेट घरी जावे लागेल. पक्षांतर करुन स्थापन केलेली १० ते १५ राज्यातील सरकारे १० वे परिशिष्ट मजबूत केल्यानंतर कोसळतील असे त्यांनी  सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2024: 15 BJP-ruled state governments will collapse as soon as the India Aghadi government comes to the Centre, warns Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.