Goa: विना परवाना प्रचार फेरी, मनोज परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 03:54 PM2024-05-06T15:54:18+5:302024-05-06T15:54:45+5:30

Goa Lok Sabha Election 2024:उसगाव येथे विना परवाना प्रचार फेरी काढल्याबद्दल रिव्होल्यूशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ मनोज परब यांच्याविरुद्ध फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa: Case registered against Manoj Parab, campaigning without license | Goa: विना परवाना प्रचार फेरी, मनोज परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  

Goa: विना परवाना प्रचार फेरी, मनोज परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  

फोंडा  - उसगाव येथे विना परवाना प्रचार फेरी काढल्याबद्दल रिव्होल्यूशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ मनोज परब यांच्याविरुद्ध फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज परब यांनी सुमारे पन्नास कार्यकर्त्यांसह दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी, बुधवारी (दि. १ मे) सायंकाळी सात वाजता तिस्क-उसगाव येथे प्रचार फेरी काढली. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फेरी काढताना रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र परब यांच्याकडून ही फेरी परवानगीविना काढण्यात आल्याची माहिती मिळताच सत्तरीचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तुकाराम परब यांच्याविरुद्ध फोंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Goa: Case registered against Manoj Parab, campaigning without license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.