‘झरी’च्या पोस्टरचे अनावरण

By Admin | Updated: December 7, 2015 01:09 IST2015-12-07T01:09:53+5:302015-12-07T01:09:53+5:30

काही वर्षांपूर्वी शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत विदर्भातील एका संवेदनशील समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता,

'Zuri' poster unveiled | ‘झरी’च्या पोस्टरचे अनावरण

‘झरी’च्या पोस्टरचे अनावरण

काही वर्षांपूर्वी शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत विदर्भातील एका संवेदनशील समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता, जो अद्यापही सुटलेला नाही. त्याची दाहकता लक्षात घेता, राधा बिडकर निर्मित ‘झरी ’ हा चित्रपट निर्मित केला असून, राजू मेश्राम यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार नीलम गोऱ्हे जोगेन्द्र कवाडे, राजेंद्र गवई, आमदार बळीराम सिरस्कर, विनोद बंब, रमेश शेंडगे, नरसय्या अडाम, लक्ष्मण तायडे, आ. सुभाष ठाकरे, माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे व अभिनेते अनंत जोग, मिलिंद शिंदे, तुकाराम बिडकर, निशा परुळेकर, नम्रता गायकवाड आणि अनिकेत केळकर या वेळी उपस्थित होते. खरोखरंच झरी चित्रपट हा कौतुकास पात्र आहे. कारण गल्लाभरू व विनोदीपटांच्या लाटेत विदर्भातील संवेदनशील विषयावर हा चित्रपट भाष्य करणारा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणतात, आज भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली, तरी दुर्गम भागात मूलभूत सोईंचा अभाव आहे आणि या विषयावर असलेला ‘झरी’ हा चित्रपट सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरेल, यात शंका नाही. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे म्हणाले की, ‘झरी चित्रपटातील लोकेशन, वऱ्हाडी भाषा आणि विदर्भातील जटिल समस्या यांचा योग्य मिलाफ साधत, लेखक- दिग्दर्शकाने चित्रपट माध्यमाचा प्रभावी आणि सुयोग्य वापर करत, एका वास्तववादी आणि विदारक अशा सत्याचा परिचय समाजाला करून दिला आहे. लेखक-दिग्दर्शक राजू मेश्राम या वेळी म्हणाले की, ‘आजही भारतात अशी अनेक दुर्गम क्षेत्रे आहेत, जिथल्या लोकांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो आहे. जेव्हा गुलाम पेटून उठतो, तेव्हाच गुलामगिरी भस्म होते,’ या वास्तवाची जाणीव त्यांना होते व झरीच्या प्रतिनिधिक रूपात...एका क्रांतीला सुरुवात होते.

Web Title: 'Zuri' poster unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.